शहरात खड्डे, खड्डे बुजवण्याची यंत्रणा रस्त्यावर पण व्हिआयपी रोडवरील खड्डे कधी बुजवणार, हर्सुल जेलसमोर सिमेंट रस्ता खोदला दुरुस्ती नाही...!

 0
शहरात खड्डे, खड्डे बुजवण्याची यंत्रणा रस्त्यावर पण व्हिआयपी रोडवरील खड्डे कधी बुजवणार, हर्सुल जेलसमोर सिमेंट रस्ता खोदला दुरुस्ती नाही...!

शहरात खड्डे, खड्डे बुजवण्याची यंत्रणा रस्त्यावर, व्हिआयपी रोडवरील खड्डे कधी बुजवणार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- शहरात नवीन पाणीपुरवठ्याची पाइपलाइन, गॅसची पाइपलाइन व नवीन वस्त्यांमध्ये ड्रेनिज लाईन टाकण्यासाठी खड्डे करण्यात आले आहे परंतु ठेकेदाराने ते खड्डे काम झाल्यावर न बुजवल्याने पावसाचे पाणी साचले व रस्ते चिखलमय होत असल्याने अपघात वाढत आहे. शहरात पावसाळ्यात झालेल्या खड्ड्यांचा प्रश्न काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी उपस्थित केला. यानंतर खड्डे बुजवण्याचे नवीन तंत्रज्ञानाचे वाहन रस्त्यावर दिसले. व्हिआयपी रस्ता दिल्लीगेट ते हर्सुल तेथपर्यंत काही ठिकाणी मुख्य रस्त्यावर काही खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पाणी साचल्याने दुचाकी वाहनधारकांचे तोल सुटुन अपघात होत असल्याची घटना हिमायत बाग सिग्नल ते दिल्लीगेट रस्त्यावर होत असल्याच्या तक्रारी मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय पोलिस चौकी सिग्नलवर खड्डा बुजवताना महापालिकेचे वाहन दिसून आले त्यांनी व्हिआयपी रोडवरील खड्डे बुजवण्याची विनंती नागरिकांनी केली त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले त्या खड्ड्यात पाणी व माती टाकली असल्याने बुजवता येत नसल्याचे उत्तर मिळाले. पाऊस आला तर तेथे आणखी अपघात होण्याचा धोका आहे. हर्सुल जेलसमोर सिग्नवर जटवाडा रोडकडे जाताना सिमेंट रस्ता पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी खोदला तो दुरुस्त केला नसल्याने वाहनधारकांना रस्ता पार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरात पावसाळ्यात रस्त्यावर झालेले खड्डे त्वरित बुजवण्याची विनंती शहरातील नागरिकांकडून केली जात आहे

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow