शहरात व्हायरल, नागरिक त्रस्त, सफा बैतूल मालने सुरू केली रुग्णांची तपासणी
 
                                शहरात व्हायरल, नागरिक त्रस्त, सफा बैतूल मालने सुरू केली रुग्णांची तपासणी...
पाणी उकळून प्यावे, सर्दी, ताप, खोकला आला तर डॉक्टरांचा
सल्ला घेऊन तपासणी करून औषधोपचार करावे...
औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) शहरात व्हायरल सुरू असल्याने दवाखान्यात रुग्णांची तपासणी करण्यासाठी गर्दी होत आहे. यावेळी रुग्णांची तपासणी करण्यासाठी सफा बैतूल माल हि सामाजिक संस्था रुग्णांच्या मदतीसाठी धावून आली आहे. शहरात या संस्थेचे गरीब वस्त्यांमध्ये आठ क्लिनिक फक्त दहा रुपये तपासणी फिस घेऊन सेवा देत आहे. आज किराडपूरा या स्लम वस्ती, बदाम गल्लीतील क्लिनिवर मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये शेकडो मुले, महिलांची तपासणी करण्यात आली. शुगर तपासणी करण्याची व दंत तपासणी यांच्या क्लिनिकमध्ये केली जाते. सध्या शहरात व्हायरल मुळे ताप, सर्दी, खोकला वाढल्यामुळे रुग्णांना त्रास जाणवत असल्याने हे शिबिर घेण्यात आले अशी माहिती डि-24 न्यूजला मुफ्ती अनिसुर्रहमान यांनी दिली आहे. यावेळी समाजसेवक साजिद मौलाना यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.अजिजूर्रहमान यांनी सांगितले शहरात व्हायरल आजाराने महीला व लहान मुलांना त्रास होत आहे यामुळे पिण्याचे पाणी उकळून घ्यावे, थंड पेय घेऊ नये, आरोग्य तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी काजी खलिलोद्दीन, सय्यद इम्रान, डॉ.अजिजुर्रहमान, डॉ.शायला, डॉ.गुलनास, डॉ.फजिलत, डॉ.सानिया यांनी परिश्रम घेतले. परिसरातील शेकडो रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            