शहराला पहील्यांदाच मिळाला राज्यपाल बनण्याचा मान हरिभाऊ बागडे यांना
शहराला पहील्यांदाच मिळाला राज्यपाल बनण्याचा मान हरिभाऊ बागडे यांना
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.28(डि-24 न्यूज) ऐतिहासिक औरंगाबाद शहराला पहील्यांदाच हरिभाऊ बागडे यांच्या रुपाने राज्यपाल बनण्याचा मान मिळाला आहे. राजस्थान राज्याचे राज्यपाल म्हणून हरिभाऊ बागडे यांची निवड करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील ते विद्यमान आमदार आहेत. 2014 ते 2019 या काळात विधानसभा अध्यक्ष पदाची जवाबदारी त्यांनी सांभाळली. महाराष्ट्रातील ते भाजपाचे निष्ठावंत नेते आहेत. 1995 मध्ये युती सरकारच्या काळात ते मंत्री होते. 1985 मध्ये औरंगाबाद पूर्व मतदार संघातून पहिल्यांदाच ते आमदार बनले. सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत असताना त्यांनी भाजपाचे काम केले. आता शासनाने त्यांना राजस्थान राज्याचे राज्यपाल म्हणून निवड केली आहे त्यामुळे त्यांचे शहर व जिल्ह्यात अभिनंदन केले जात आहे.
What's Your Reaction?