शहर पोलिसांना आता तिसरा डोळा, गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी शहरावर ड्रोन कॅमेराची नजर...!
शहर पोलिसाला “तिसरा डोळा”
* शहर पोलिसाचे बळकटीकरण करण्यासाठी ९ ड्रोन कॅमेरे स्मार्ट सिटी कडून
* गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी ड्रोन महत्त्वाचे ठरतील: पोलीस आयुक्त
* हा पोलिसांसाठी तिसरा डोळा
छ. संभाजीनगर(औरंगाबाद)दि.20(डि-24 न्यूज) शहरात कायदा व सुव्यवस्था वाढवण्याचा दृष्टीने स्मार्ट सिटी व शहर पोलिसांकडून महत्त्वाचे पाळत ठेवण्यासाठी व सूचना देण्यासाठी 9 कस्टमाइज्ड क्वॉडकॉप्टर ड्रोन घेण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेल्या या सर्व ड्रोन पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर याना स्मार्ट सिटी तर्फे गुरुवारी हस्तगत करण्यात आले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटी सीईओ जी श्रीकांत यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीचा निधीतून हे अत्याधुनिक ड्रोन शहर पोलिसाच्या समन्वयाने व त्यांचा गरजेनुसार तयार करण्यात आले आहेत.
गुरुवारी स्मार्ट सिटी कार्यालय येथे हे स्मार्ट सिटीने पोलिसाला हस्तांतरण केले. यावेळेस छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटी सीईओ जी श्रीकांत, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त संदीप पाटील, पोलीस उपायुक्त झोन १ नितीन बगाटे, पोलीस उपायुक्त झोन २ नवनीत कानवत, पोलीस उपायुक्त (गुन्हा) प्रशांत स्वामी, सर्व सहायक पोलीस आयुक्त व सर्व पोलीस निरीक्षक, मुख्य लेखाधिकारी उत्तम चव्हाण, बस विभाग प्रमुख संजय सुपेकर, एच आर मैनेजर विष्णू लोखंडे, प्रकल्प व्यवस्थापक फैज अली हे उपस्थित होते.
मनपा प्रशासक यांनी यावेळेस बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नवीनच निवडून आलेले खासदार संदीपान भुमरे यांचे आभार मानले आणि म्हणाले की ड्रोन शहराच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे “तिसरा डोळा “ ठरणार आहे.
पोलीस आयुक्त म्हणाले की शहर पोलीसाकडे मनुष्यबळ कमी असताना तंत्रज्ञान ती कमी भरून काढायला साहाय्य करू शकतो. या ड्रोन मुळे गुन्हेगारीला वचक बसेल.
पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव व स्मार्ट सिटीचे फैज अली यांनी या ड्रोनचे अश्याप्रकारे सांगितले. या क्वॉडकॉप्टर ड्रोन 8 मेगापिक्सलचे असून याना 30 एक्स ऑप्टिकल झूम आहे. सोबतच यामध्ये २ स्पिकर बसवण्यात आले आहे ज्याद्वारे महत्वाचे सूचना दे
ण्यात येतील.
What's Your Reaction?