शासती से आझादी योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद, 15 जुलैला 1.17 तर आज 1.42 कोटी कर वसूली

15 जुलैला 1.17 कोटी तर आज 1.42 कोटी कर वसुली
शासती से आझादी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)
महानगरपालिका तर्फे नागरिकांना कराची शास्तीपासून मुक्त करण्यासाठी राबवण्यात आलेली योजना "शासती से आझादी" या योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक या योजनेचा लाभ घेत असून दिनांक 15 जुलै रोजी 1.17 कोटी एवढी वसुली झाली तर आज दिनांक 16 जुलै रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत 1.42 कोटी एवढी मालमत्ता आणि पाणीपट्टी कर वसुली झालेली आहे, अशी माहिती उपायुक्त-1 तथा कर निर्धारक व संकलक विकास नवाळे यांनी दिली.
महानगरपालिकेने दिनांक 15 जुलै ते 15 ऑगस्ट "शास्ती से आझादी" या योजनेअंतर्गत निवासी व मिश्र मालमत्तांवर थकबाकी कर एक रकमी भरल्यावर शास्तीमध्ये 95 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. तसेच दिनांक 16 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर पर्यंत "शासती से मुक्ती" या योजनेअंतर्गत निवासी व मिश्र मालमत्तांवरील थकबाकी कर एक रकमी भरल्यास शास्तीवर 75 टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी मिश्र मालमत्तेसाठी देखील निवासी कर आकारण्यात येईल अशी घोषणा नुकतीच केली आहे.
या सर्व योजना आणि सुविधांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन महापालिकेशी सहकार्य करावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
What's Your Reaction?






