शिवसेनेच्या(उबाठा) वतीने क्रांतीचौकात जन आक्रोश आंदोलन...

 0
शिवसेनेच्या(उबाठा) वतीने क्रांतीचौकात जन आक्रोश आंदोलन...

महायुती सरकार मधील कलंकित मंत्र्यांची लाज वाटतेय, उबाठाचा आरोप...

शिवसेनेचे क्रांती चौकात महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन

कलंकित मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची केली मागणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) - महायुती सरकारमधील कलंकित मंत्र्यांची आम्हाला लाज वाटते अशी घोषणाबाजी करत शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज सकाळी क्रांती चौकात महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. आपल्या कलंकित कारनाम्यामुळे आणि वाचाळ वक्तव्यामुळे महाराष्ट्राला कलंक लावणाऱ्या या कलंकीत मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

माझ्या राज्याचा मंत्री नोटाच्या बॅग घेऊन बसतो, मला लाज वाटते. माझ्या राज्याचा मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकतो, मला लाज वाटते. माझ्या राज्याचा मंत्री डांस बार चालवतो, मला लाज वाटते. माझ्या राज्याचा मंत्री विधीमंडळात रम्मी खेळतो मला लाज वाटते. माझ्या राज्याचा मंत्री अघोरी जादू टोना करतो, मला लाज वाटते, अशाप्रकारे जोरदार घोषणाबाजी यावेळी शिवसैनिकांनी करून निषेध व्यक्त केला.

मराठी चित्रपट अशी ही बनवाबनवीच्या चित्रपटासारखे पोस्टर अंबादास दानवे यांनी हातात घेतले होते. या पोस्टवर निर्माता, दिग्दर्शक आणि संवादक राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना दर्शविण्यात आले होते. तर कलाकार म्हणून संजय नोटवाले, रम्मीराव ढेकळे, योगेश डान्सबारवाले, गुलाबी महाजन व अघोरी जादूवाले असे नाव देण्यात आले होते. मंत्री संजय शिरसाठ, भरतशेठ गोगावले, गिरीश महाजन, योगेश कदम व माणिकराव कोकाटे यांची प्रतिमा या पोस्टर मध्ये दाखविण्यात आली होती. 

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्त्यांच्या माळा गळयात घालून मंत्र्यांच्या विरोधात उपरोधिक निषेध व्यक्त केला. किसानसेना जिल्हाप्रमुख नानासाहेब पळसकर हे शेतकऱ्यांचा आसूड घेऊन आले होते. कलंकित मंत्र्याचे करायचे काय खाली डोकं वर पाय अशा आक्रमक घोषणा यावेळी मंत्र्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी दिल्या. 

मंत्री योगेश कदम यांच्याविरोधात डान्सबारचे प्रतिकात्मक पथनाट्य सादर करण्यात आले. नकली नोटा यावेळी उधळण्यात आल्या..

मला लाज वाटते नावाचे पथनाट्य सादर करून महाराष्ट्राची या कलंकित मंत्र्यामुळे झालेल्या बदनामी यावेळी दाखविण्यात आली. संजय शिरसाठ यांच्या व्हायरल व्हिडिओवर उपरोधिक्त पथनाट्यात सादरीकरण करून आणि सिगारेट पिण्याचे प्रात्यक्षिक दाखवून मंत्री संजय शिरसाठ यांच्या अप्रत्यक्ष टोला लगावला..

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान भवन सभागृहात खेळलेल्या रम्मीच्या प्रकरणावर या पथनाटक भाष्य करण्यात आले. रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी अंधश्रद्धा पसरविणारी जादू टोना पसरविणारी अघोरी पूजा केल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. युवराज सुतार, राकेश भालेराव, सुबोध जाधव, वंदना एन्डोले, सुरेश मारकळ , शिवम शर्मा व 

सतीश पाटील यांनी मला लाज वाटते पथनाट्य सादर केले. 

पत्ते खेळताना दाखवलेल्या सादरीकरणावर प्रश्न विचारले असता विधीमंडळात रम्मी खेळली जाऊ शकते तर रस्त्यावर का खेळली जाऊ शकत नाही, असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.

कलंकित मंत्र्यांच्या विरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात जिल्हाव्यापी आंदोलन करण्यात आले. कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्या विरोधात शिवसेनेने आवाज उठवला आहे. शिवसेनेने उठवलेला हा आवाज या कलंकित मंत्र्यांना घरी बसल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी बोलताना दिला. 

महाराष्ट्रातील मंत्री मोठ्या प्रमाणात घोटाळे करत असल्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री हे मंत्री महाराष्ट्राचे बदनामी करत असताना सुद्धा शांत असून ते सुद्धा हतबल आहेत. नोटावाले, हनी ट्रॅपवाले, रम्मीवाले, डान्स बारवाले आणि जादूटोणावाले महाराष्ट्राची बदनामी करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का...? असा प्रश्न शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला.

इंडिया आघाडीच्या दिल्लीतील मोर्चावर केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला...

देशातील मतदार यादीमध्ये झालेल्या गैर व्यवहाराच्या विरोधात इंडिया आघाडीने दिल्लीमध्ये निवडणूक आयोग भवन ते संसद भवन मोर्चा काढण्याचे ठरविले होते. केंद्र सरकारने या मोर्चा विरोधात निमलष्करी दलाच्या माध्यमातून कारवाई केल्याने लाज वाटते आंदोलनाच्या नंतर शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. 

याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, अनिल चोरडिया, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, महानगप्रमुख राजू वैद्य, माजी आमदार उदयसिंग राजपूत, किसानसेना जिल्हाप्रमुख नानासाहेब पळसकर, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, दत्ता गोर्डे, अशोक शिंदे, विजय वाघमारे, लक्ष्मण भाऊ सांगळे, राजू इंगळे, किशोर कच्छवाह, गिरीजाराम हाळनोर, अरविंद धीवर, विठ्ठल बदर पाटील, अविनाश पाटील, बाबासाहेब डांगे, तालुकाप्रमुख मनोज पेरे, सोमीनाथ करपे,सुभाष कानडे, विष्णु जाधव,आनंद भालेकर, सचिन वाणी,शंकर ठोंबरे,

शहरमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे पाटील, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक वीरभद्र गादगे, गोपाल कुलकर्णी, शहर संघटक सचिन तायडे, मनोज गायके, बाळासाहेब कार्ले, विशाल खंडागळे, महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनिता देव, दुर्गा भाटी, अनिता मंत्री, जिल्हा संघटक आशा दातार, राखी परदेशी, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, अरुणा भाटी, शहर संघटक भागूआक्का शिरसाठ, सुनिता सोनवणे, मीरा देशपांडे, रूपाली मोहिते, स्वाती माने, युवासेना जिल्हा युवा अधिकारी विठ्ठल डमाळे, हनुमान शिंदे, किरण तुपे, रामेश्वर कोरडे व अक्षय साठे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow