अझहर तांबोळी एसडिपिआयचे नवीन प्रदेशाध्यक्ष

 0
अझहर तांबोळी एसडिपिआयचे नवीन प्रदेशाध्यक्ष

अझहर तांबोळी SDPI चे नवीन प्रदेश अध्यक्ष...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ( SDPI ) पक्षाची महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी परिषद औरंगाबाद मध्ये पार पडली. परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अब्दुल मजीद फैजी, राष्ट्रीय सरचिटणीस यास्मिन फारूकी, राष्ट्रीय सचिव रियाज फरंगीपेटे तसेच राज्याच्या सोळा जिल्ह्यातील पक्षाच्या प्रतिनिधिंनी भाग घेतला. कार्यक्रमाच्या उद्धघाटन प्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस यास्मिन फारूकी यांनी सांगितले की SDPI पक्ष हा मागासलेल्या, शोषित, वंचितांचा आवाज म्हणून एक वास्तविक पर्यायी राजकीय पक्ष आहे. देशभरात नागरिकांवर होत असलेल्या अत्याचार, अन्यायाविरुद्ध निःस्वार्थ पणे लढणारा एकमेव पक्ष हा SDPI आहे.

तसेच माजी प्रदेश समिती ने सादर केलेल्या आपल्या कार्यकाळाच्या अहवालाचा आढावा घेऊन सविस्तर चर्चा झाली. यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस अब्दुल मजीद फैजी यांच्या नेतृत्वात निवडणूक प्रक्रिया पार पडली. तसेच फैजी यांनी महाराष्ट्र राज्याच्या नवीन कार्यकारणी समीतीची घोषणा करत नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर अझहर तांबोळी यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य कार्यकारणी समिती SDPI खालीलप्रमाणे... 

अझहर तांबोळी 

प्रदेश अध्यक्ष, 

पुणे, सदाशिव त्रिपाठी 

(प्रदेश उपाध्यक्ष)

मुंबई, युसुफ खान पटेल 

(प्रदेश उपाध्यक्ष),

औरंगाबाद, शेख सरफराज 

(प्रदेश सरचिटणीस),

मंब्रा ठाणे, सईद चौधरी 

(प्रदेश सरचिटणीस),

मुंबई, सय्यद कलिम 

(प्रदेश सरचिटणीस), 

औरंगाबाद, ताज सिद्दीकी 

(प्रदेश सचिव),

पुणे, जैनब खान 

(प्रदेश सचिव),

मुंब्रा ठाणे, एजाज अहमद 

(कोषाध्यक्ष), नांदेड, 

मुश्ताक महाज 

(सदस्य), मालेगाव नासिक,अब्दुल्ला खान 

(सदस्य),मालेगाव नाशिक,

राहिल हनीफ 

(सदस्य), मालेगाव, नाशिक, दिलावर सय्यद 

(सदस्य), पुणे, शागुफ्ता शेख 

(सदस्य), मुंब्रा ठाणे, 

हाफिज मोहतासिम 

(सदस्य), परभणी यांची निवड प्रदेश कार्यकारिणीवर झाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow