शंभुनगर, पैठणगेटच्या पाणीप्रश्नावर भाकपाची तीव्र निदर्शने...!

शंभूनगर आणि पैठणगेटच्या पाणीप्रश्नांवर भाकपची तीव्र निदर्शने !
छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद) दि. 10(डि-24 न्यूज) शंभूनगर व पैठणगेट येथील ढोलवाली गल्लीला रमजान पूर्वी पाणी द्या, शहनाज बेगम यांच्या घरासमोर ड्रेनेज लाईन टाका , शंभूनगर मध्ये तात्पुरते सार्वजनिक नळ सुरू करा , घंटागाडी पाठवा , नाल्याची सफाई करा, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा या व इतर मागण्यांसाठी भारतीय महिला फेडरेशन व भाकप तर्फे मनपा टाऊन हॉल कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली .
शंभूनगर येथे शहेनाझ बेगम यांच्या गल्लीमध्ये ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली नाही , ती तातडीने पूर्ण करावी , ड्रेनेज लाईन टाकल्या शिवाय सिमेंट रोडचे काम करू नये , शंभूनगर भागात पाण्याची लाईन आली परंतू 2025 ला पाणी देतो म्हणाले आता 2027 ला मिळेल म्हणतात तातडीने शंभूनगरला सार्वजनिक नळ कनेक्शन द्या , शंभूनगरच्या नाल्यातून पाण्याची पाईपलाईन आहे तिथे सर्व लोक पाणी भरतात त्या नळजवळ काही लोक कचरा टाकतात तिथे जवान उभे करून दंडात्मक कारवाई करा , शंभूनगरात घंटा गाडीची फेरी सुरू करा , घराच्या मागच्या तीन फुटाच्या गल्लीत कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा , शंभूनगरातील अनवरबी , पुष्पा गवळी , नफिसाबेगम यांच्या घरासमोरील फुटलेल्या ड्रेनेज लाइन दुरुस्त करा किंवा नवीन लाईन टाका , त्याचबरोबर पैठणगेट येथील ढोलवाली गल्लीला पाणी द्या या मागणी चे निवेदन मनपा उप अभियंता चौधरी यांनी स्विकारले व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले .
या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शंभूनगर व पैठणगेटला रमजान पूर्वी पाणी दया , पैठण हुन येणाऱ्या पाईपलाईनवर रस्ता झालाच कसा जवाब दो, पाणी आमच्या हक्काच, शंभूनगरच्या नाल्यात कचरा टाकणार्यावर कारवाई झालीच पाहिजे इत्यादी घोषणांनी परिसर दणाणून गेला. या निदर्शनात ॲड अभय टाकसाळ, कॉ रफीक बक्श, कॉ राजू हिवराळे, जफर खान, फजलू रहमान खान, रुबीना जफर खान, शेहनाज शेख, पुष्पा गवळी, महेमूद बक्श, सय्यद फेरोज, नसरिन शेख वाजेद, आस्मा शेख मौला, जरिना शेख महेबुब, शमशाद बशीर शेख,
तस्लीम शेख, आबेदा शेख महेबुब, सुमनबाई धूमाळ, नंदाबाई बेदवे, आशा चव्हाण, सय्यदा सय्यद अनवर, शेख हनिफ अहमद, शेख फराद शेख फैय्याज, अबुजर जफर खान यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते. यावेळी वरील मागण्या मंजूर न झाल्यास शंभूनगर पासून पदयात्रा सुरू केल्या जातील असा इशाराही देण्यात आला.
What's Your Reaction?






