कांचनवाडीत Women's Happiness Centre चे शानदार उद्घाटन

कांचनवाडीत Women's Happiness Centre चे शानदार उद्घाटन...
महीलांना आरोग्य सशक्त बनवण्यासाठी निवासी केंद्र
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) डॉ.ए.ए.कादरी यांचे कांचनवाडी येथे महीलांना आरोग्य सशक्त बनवण्यासाठी निवासी Women's Happiness Centre चे शानदार उद्घाटन रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
कांचनवाडी येथील नाथ व्हॅली स्कुलजवळ श्रीमती अंजूम कादरी यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
या सेंटरमध्ये महीला डॉक्टर व स्टाफ महीला रुग्णांचे उपचार व रुग्णसेवा करणार आहे. महीला न्यूरोसाइक्रीट्रीक रुग्णांची विशेष रुग्णसेवा या सेंटरमध्ये केली जाणार आहे. उपचार घेणाऱ्या महीलांना सामान्य जीवन जगण्यासाठी शिलाई मशीन कोर्स, पेंटिंग, भोजन बनवणे, जैविक शेती, खेळ व मनोरंजनाची व जनावरांशी संवाद सुसज्ज जीम सुविधा दिड एकरवर बनलेल्या या दिड एकरवर निसर्गरम्य वातावरणात बनलेल्या Women's Happiness Centre वर सुरू केली आहे. अॅम्बूलन्स आपात्कालीन सेवा पण रुग्णांना दिली जाणार आहे. डॉ.ए.ए.कादरी मानसिक स्वास्थ्य केंद्र पडेगाव, हॅपी फॅमिली हाॅस्पिटल आझाद चौक येथे मनोरुग्ण रुग्णांना सेवा दिली जाते परंतु कांचनवाडी येथे स्वतंत्र महीलांसाठी शहरातील पहीले असे विशेष सेंटर सुरू करण्यात आले आहे.
याप्रसंगी डॉ.अजिज अहमद कादरी, डॉ. मेराज कादरी, डॉ.सना कादरी खिलजी, डॉ.फैसल खिलजी, असफहान सिद्दीकी, मोहम्मद नजीर, डॉ.सय्यद जफर, विजय सोनोने, चेतन चौहान, हम्माद यांनी उद्घाटन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?






