शेख सलिम युसुफ यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते संपन्न
प्रभाग क्रमांक 3 चे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शेख सलिम युसुफ यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते उत्साहात
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) - प्रभाग क्रमांक 3 चे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शेख सलिम युसुफ यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.
याप्रसंगी भाषण करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी एमआयएमवर हल्लाबोल केला. एमआयएम धर्माच्या नावावर नावाखाली समाजात फूट पाडून मते मागत आहे. एमआयएम केवळ जाती धर्मात विष निर्माण करत आहे. काल जे वादविवाद रैली दरम्यान झाले हि
घटना शहरात घडली त्याचा त्यांनी निषेध केला. काँग्रेस पक्ष लोकांना जोडणारा पक्ष आहे. काही पक्ष जाती धर्माच्या नावावर मते मागून दिशाभूल करत आहेत. त्याच्या अमिषाला आता जनता बळी पडणार नाही. शेख सलिम युसुफ हे या महापालिका निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना यावेळी त्यांनी केले.
यावेळी खासदार डॉ कल्याण काळे, माजी आमदार एम.एम.शेख, प्रकाश मुगदीया, किरण पाटील डोणगावकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख व प्रभागातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
What's Your Reaction?