शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती साठी शिवसेनेची शहरात "बळीराजा गर्जना " ट्रॅक्टर रॅली
संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शिवसेनेची ‘बळीराजा गर्जना’ ट्रॅक्टर रॅली...
पोलिसांच्या अडथळ्यांनाही न जुमानता शेतकऱ्यांचा शिवसेनेने व्यक्त केला आक्रोश...
छत्रपती संभाजीनगर, दि.16(डि-24 न्यूज)- शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तीशिवाय संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, सातबारा कोरा करण्यात यावा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे या मागण्यांसाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजकतेखाली मराठवाडाव्यापी ‘बळीराजा गर्जना’ ट्रॅक्टर रॅली मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली.
क्रांती चौक येथून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत निघालेल्या या रॅलीला रोखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. गोपाल टी कॉर्नर परिसरात बॅरिकेड्स उभारून शेतकरी आणि शिवसैनिकांनी आणलेले ट्रॅक्टर अडविण्यात आले. आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने आंदोलनस्थळी पोलीसच मोठ्या प्रमाणावर दिसत होते.
“छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद”, “शिवसेना जिंदाबाद”, “नको अटी - नको शर्ती, आम्हाला पाहिजे - कर्जमुक्ती” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ट्रॅक्टरना भगवे झेंडे आणि कर्जमुक्तीच्या मागण्यांचे फलक लावण्यात आले होते.
या रॅलीचे नेतृत्व स्वतः आमदार अंबादास दानवे यांनी ट्रॅक्टर चालवत केले. त्यांच्या ट्रॅक्टरवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि शिवसेना उपनेते सुभाष पाटील उपस्थित होते. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेले शेतकरी, शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
रॅलीनंतर विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ही प्रत्यक्षात कर्जमाफी नसून कर्जवसुलीची योजना असल्याचे उल्लेखीत केले. शेतकऱ्यांची कोणत्याही अटी-शर्तीशिवाय संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
तसेच कांदा, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, पीककर्ज व कर्ज नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, खतांचा काळाबाजार रोखावा, शेतीपंपांना सलग वीजपुरवठा करावा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी घोषित 33 हजार कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची तातडीने अंमलबजावणी करावी आणि विमा कंपन्यांकडून योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
या सर्व मागण्या तातडीने मान्य न झाल्यास शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणखी तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार उदयसिंग राजपूत, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र काळे, जिल्हा संघटक डॉ. सुनील शिंदे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, किशोर कच्छवाह, संतोष खेंडके, किसानसेना जिल्हाप्रमुख नानासाहेब पळसकर, बाबासाहेब मोहिते, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, तालुकाप्रमुख विष्णू जाधव, शंकर ठोंबरे, आनंद भालेकर, सोमीनाथ करपे, दिलीप मचे, संजय मोटे, विधानसभा प्रमुख प्रमोद ठेंगडे, विधानसभा संघटक गिरीश चपळगावकर, गणेश नवले, कपिद्र पेरे, उपशहरप्रमुख सोमीनाथ नवपुते, नितीन पवार, गोरख सोनवणे, अजय चोपडे, बापू कवळे, दिनेशराजे भोसले, सुरेश गायके, वसंतभाई शर्मा, नगरसेवक सचिन खैरे, रामेश्वर कोरडे, राहुलकुमार सोनवणे, नंदू लबडे, गजेंद्र दळवी, नरेंद्र देवत्वाल, देविदास रत्नपारखी, बाबासाहेब बडक, नारायण जाधव, प्रतीक अंकुश, ज्ञानेश्वर शेळके, रामू सुरासे, रामेश्वर काळे, दीपक महाडिक, विजय यादव, सुरेश थोरमोठे, राजेंद्र पवार, सलीम खामगावकर, देवेंद्र गायकवाड, किरण जोशी, स्वप्निल ढाकणे, दीपक तांबे, मयुर तुपे, युवासेना विभागीय सचिव धर्मराज दानवे,अभिजीत थोरात, रामू सुरासे,नागेश थोरात, महिला आघाडी महानगर संघटक सुकन्या भोसले, दुर्गा भाटी व सीमा गव
ळी उपस्थित होते.
What's Your Reaction?