शेतकऱ्यांसाठी कापूस किसान मोबाईल अॅप
 
                                शेतकऱ्यांसाठी ‘कापूस किसान मोबाईल ॲप’
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय कपास महामंडळ (CCI) तर्फे ‘कापूस किसान मोबाईल ॲप’ सुरू करण्यात आले आहे. हे ॲप कापूस हंगामात २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध राहणार असून, शेतकऱ्यांना नोंदणी व स्लॉट बुकिंग प्रक्रियेसाठी मदत करेल.
या ॲपमध्ये नोंदणी, स्लॉट बुकिंग तसेच आवश्यक मार्गदर्शक सूचना सविस्तरपणे दिलेल्या आहेत. प्रक्रियेविषयी अधिक माहिती व मार्गदर्शक व्हिडिओसाठी शेतकऱ्यांनी www.youtube.com/@KapasKisan-Official या अधिकृत यूट्यूब लिंकला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्लॉट बुकिंग प्रक्रिया : स्लॉट बुकिंग सुविधा 7 दिवसांच्या रोलिंग बेसिसवर खुली राहणार असून, प्रत्येक दिवशी एक तारीख बंद होईल आणि नवीन तारीख खुली होईल. उद्घाटनाच्या दिवशी सुट्टी राहणार नाही.
महाराष्ट्र राज्यातील अकोला आणि छत्रपती संभाजीनगर शाखांसाठी स्लॉट बुकिंगची वेळ दररोज सकाळी 10 वाजता सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित चे प्रभारी विभागीय व्यवस्थापक यांनी दिली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            