श्री गणेशोत्सव महासंघ उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॠषीकेश जैस्वाल
श्री गणेशोत्सव महासंघ उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॠषीकेश जैस्वाल
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.29(डि-24 न्यूज) वर्ष 2024 श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॠषीकेश प्रदीप जैस्वाल यांची निवड सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दशकांची परंपरा असलेल्या गणेश महासंघ उत्सव समितीची ख्याती असून एन-5 सिडको भागात झालेल्या एक व्यापक बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार हे उपस्थित होते.
सुत्रसंचालन व प्रास्ताविक राजेंद्र दाते पाटील यांनी केले. अध्यक्षपदी ॠषीकेश जैस्वाल यांचे नाव राजू शिंदे यांनी सूचवले तर त्यास अनुमोदन सुमीत खांबेकर यांनी दिले.
या बैठकीत तनसुख झांबड, डी.एन.पाटील यांनी मार्गदर्शन करुन नवनिर्वाचित अध्यक्षास उत्सवाची पुढील रुपरेषा कशी असावी याबद्दल मार्गदर्शन केले. अनिल बोरसे पाटील यांनी विविध प्रकारच्या उपक्रमाची माहिती दिली. अभिजित देशमुख, सुमीत खांबेकर, गोकुळ मलके, अभिषेक देशमुख यांनी आपले मत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अनिकेत पवार, हरिष शिंदे, संदीप शेळके, विशाल दाभाडे, अरुण बोंगाने, अभय देशपांडे, नागेश भालेराव, नंदु लबडे, ज्ञानेश्वर शेळके, विशाल दाभाडे, राजेंद्र पारगावकर, धीरज पाटील, बाळासाहेब औताडे, दिग्विजय पाटील यांची उपस्थिती होती.
नवनिर्वाचित अध्यक्ष ॠषीकेश जैस्वाल यांनी निवड सर्वानुमते झाल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावर्षी महासंघाची उच्च परंपरा लक्षात घेता नवनवीन समाजोपयोगी उपक्रम राबवून निवड सार्थ ठरविण असे ते म्हणाले. उपस्थित मान्यवरांचे आभार राजेंद्र दानवे यांनी व्यक्त केले. लवकरच व्यापक कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे अध्यक्षांनी यावेळी जाहीर केले.
What's Your Reaction?