संजय सिरसाट खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचा उबाठाचा आरोप, पोलिस आयुक्तांना निवेदन

 0
संजय सिरसाट खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचा उबाठाचा आरोप, पोलिस आयुक्तांना निवेदन

विधानसभाप्रमुख राजू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची घेतली भेट...

आमदार संजय शिरसाठ खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचे दिले निवेदन

छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख राजू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त प्रविण पवार यांची गुरुवार, ता. १२ सप्टेंबर रोजी भेट घेतली. आमदार संजय शिरसाठ खोटे गुन्हे दाखल करून धमकी देत असल्याचे निवेदन यावेळी देण्यात आले.

आमदार संजय शिरसाठ व त्यांच्याशी संबधीत गुंड प्रवृत्तीच्या व इतर लोकांकडून सातत्याने शिवसैनिकांना खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. पोलीस आयुक्त माझ्या शिफारसीने येथे आलेले आहेत ते माझ्या सांगण्यानुसारच काम करतात. त्यामुळे राजकीय दृष्ट्या माझ्या विरोधकांना मी कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवून निवडणुक जिंकेल अशा प्रकारच्या धमक्या व दमदाट्या देत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

राजू शिंदेसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना, नातेवाईकांना व मित्रांना मी खोट्या गुन्ह्यात अडकवेल असेही ते वक्तव्य करत असल्याचे पत्रात अधोरेखित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त आपण स्वतः या गंभीर प्रकरणात लक्ष घालून कोणत्याही शिवसैनिकांवर अथवा आमदार संजय शिरसाठ यांच्या राजकीय विरोधकांवर पूर्वग्रहदूषित कारवाया करताना योग्य खबरदारी घ्यावी. तसेच आमदार शिरसाठ यांचे अनेक कार्यकर्ते राजरोसपणे गुंडागर्दी, अवैध दारुविक्री व अतिक्रमणे असे कृत्य करीत असुन यावरही कारवाई करावी अशी मागणी या शिष्टमंडळाने पत्राद्वारे केली आहे. 

याप्रसंगी महानगरप्रमुख राजु वैद्य, उपजिल्हाप्रमुख विजय वाघमारे, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, उपशहरप्रमुख बापू कवळे, सुगंधकुमार गडवे, पुरुषोत्तम पानपट, संदेश कवडे,गणेश लोखंडे व गौरव पुरंदरे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow