सतीश चव्हाण यांनी कामाचा माणूस म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली - महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे

 0
सतीश चव्हाण यांनी कामाचा माणूस म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली - महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे

आमदार सतीश चव्हाण यांनी कामाचा माणूस म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली

 – महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे

वैजापूर येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद; प्रचारासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन

वैजापूर, दि.16(डि-24 न्यूज), मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची काम करण्याची पद्धत आदरणीय अजितदादा पवार यांच्यासारखी आहे. त्यांनी देखील मराठवाड्यात आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशालीताई नागवडे यांनी केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 23 ऑक्टोबर रोजी होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज वैशाली नागवडे यांनी कन्नड, वैजापूर तालुक्यात विविध ठिकाणी भेटी देऊन पदवीधर मतदाराची संवाद साधला.

वैजापूर येथील डॉ. अमोल अन्नदाते यांच्या आनंद होमिओपॅथी कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीत बोलताना वैशाली नागवडे म्हणाल्या की, “सतीश चव्हाण यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उत्कृष्ट काम केले आहे. स्व.अजितदादा पवार यांनी ज्या पद्धतीने कामाचा माणूस म्हणून आपली ओळख निर्माण केली, त्याच पद्धतीने सतीश चव्हाणही काम करत आहेत. ” सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष स्वातीताई कोल्हे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक सुवर्णा संजय जाधव, छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्ष भाग्यश्री राजपूत, वैजापूर तालुकाध्यक्ष दत्तात्रय पाटील, अकील शेख, उपनगराध्यक्ष रियाज शेख, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, महिला शहराध्यक्ष ज्योती कापसे, हिराताई जाधव, शोभाताई खोरसे, माजी जिल्हा परिषद सदस्य सूरज नाना पवार, बाळासाहेब भोसले, डॉ. अमोल अन्नदाते, पंचायत समिती सदस्य राहुल लांडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow