समाजवादी महानगर व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त, नवीन चेह-यांना देणार संधी

 0
समाजवादी महानगर व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त, नवीन चेह-यांना देणार संधी

समाजवादी पार्टीची छत्रपती संभाजीनगर कार्यकारिणी बरखास्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगर आणि जिल्हा समाजवादी पार्टीची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबु आसीम आझमी यांच्या आदेशाने ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. या निर्णयाचे अधिकृत पत्र महानगराध्यक्ष फैसल खान यांच्या नावाने समाजवादी पार्टीचे प्रदेश प्रमुख महासचिव परवेज़ सिद्दीकी यांनी जारी केले आहे.

पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी तयारी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे जिल्हा आणि महानगर स्तरावर नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पक्ष संघटनाचे पुनरुज्जीवन आणि नव्या जबाबदाऱ्यांसाठी सक्षम नेत्यांची निवड करण्याचा उद्देश या कारवाईमागे असल्याचे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता आहे.

समाजवादी पार्टीने यापूर्वीही अशा निर्णयांद्वारे संघटनात्मक बळकटीकरणाचा प्रयत्न केला आहे. यामुळे नव्या नेतृत्वाला पुढे येण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow