समाजाचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी एसडिपिआयचे तीन उमेदवार मैदानात - जिल्हाध्यक्ष साकी अहमद
 
                                समाजाचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी एसडिपिआयचे तीन उमेदवार मैदानात - जिल्हाध्यक्ष साकी अहमद
जनतेच्या पाठबळावर पूर्ण ताकदीनिशी एसडिपिआय निवडणुकीच्या रिंगणात...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) एसडिपिआय नेहमी जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करते आता निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहेत. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून मुजंमिल खान, पैठण विधानसभा मतदारसंघातून हाफिज इम्रान शेख यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करत दाखल केला आहे.
समाजावर अन्याय वाढत आहे. आमचे धार्मिक स्थळ सुरक्षित नाही, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य केले जात आहेत. वक्फ सुधारणा विधेयक आणून वक्फच्या मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात विविध नागरी समस्या आहेत. आरोग्य रोजगार व शिक्षणाचे, स्काॅलर्शिपचे प्रश्न समोर आहेत. मतदारांनी फक्त वक्तव्य करुन मते लाटणा-यांना व प्रस्थापितांना संधी न देता एसडिपिआयच्या उमेदवारांना भरभरून मते देवून या निवडणुकीत विजयी करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष साकी अहमद यांनी केले आहे.
औरंगाबाद पूर्व व मध्य मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना अब्दुल जब्बार खान, नदीम शेख, हाफीज अबुजर पटेल, मोहसीन खान, अशरफ पठाण , समीर शाह, रियाज शेख, हाफिज समीउल्लाह व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
पैठण विधानसभा मतदारसंघ निवडणूकसाठी हाफिज इम्रान शेख यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काजी हाफिज अब्दुल समी, शफीक बाबू शेख, मौलाना अब्दुल रहेमान, अकील चांद शेख, मुजंमिल खलिल टेकडी, शेख वसिम, शेख आजम, शेख बबलू, वसिम कुरेशी, शेख जुनेद, जुनेद लतिफ शेख, शेख शोएब, शेख अथर, शेख इम्रान, सोहेल मिर्झा, सय्यद अलताफ, शेख अयूब, शेख अन्वर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित
 
 
होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            