सरला बेटकडे जाणारा लाॅन्ग मार्च तुर्त स्थगित, मुस्लिम नुमायंदा कौन्सिलची माहिती

 0
सरला बेटकडे जाणारा लाॅन्ग मार्च तुर्त स्थगित, मुस्लिम नुमायंदा कौन्सिलची माहिती

सरला बेटकडे जाणारा लाॅन्ग मार्च तुर्त स्थगित, मुस्लिम नुमायंदा कौन्सिलची माहिती...

बाबा रामगिरी व नितेश राणे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मागिल 29 दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू आहे....हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) शुक्रवारी बाबा रामगिरी यांच्या सरला बेटकडे लाॅन्ग मार्च करण्याचा निर्णय मुस्लिम नुमायंदा कौन्सिलने घेतला होता परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असल्याने प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व समाजकंटक याचा गैरफायदा घेवू शकतात म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हा लाॅन्ग मार्च तुर्त स्थगित करण्यात येत आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना थांबवण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे अध्यक्ष जियाऊद्दीन सिद्दीकी यांनी केले आहे.

या सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले परंतु या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी आपल्या जाहारनाम्यात आमच्या मागणीचा उल्लेख करावा व नवीन सरकार स्थापन झाल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी अॅड फैज सय्यद, मेराज सिद्दीकी, शेख मुनतजीबोद्दीन, अॅड खान सलिम खान, मोईद हशर, हिशाम उस्मानी, ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला आदींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow