सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवार पुन्हा अक्रामक, शेतकऱ्यांचा केंब्रिज चौकात रस्ता रोको आंदोलनाने वाहतूक ठप्प...
सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवार पुन्हा अक्रामक, शेतकऱ्यांचा केंब्रिज चौकात रस्ता रोको
खासदार सुप्रिया सुळे आणि काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले नंतर त्यांची सुटका करण्यात आली...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.29(डि-24 न्यूज)- शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी देण्यासाठी बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचा पंढरपूरच्या विठुरायाच्या पवित्र भूमीत दिलेला शब्द सरकारने पाळला नसल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील केंब्रीज चौकात जोरदार एल्गार आंदोलन छेडण्यात आले. यावेळी काही काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने जालना रोड येथील वाहतूक ठप्प झाली होती.
या आंदोलनात संपूर्ण मराठवाड्यातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते अनिल देशमुख, खासदार निलेश लंके, खासदार कल्याण काळे, खासदार अमर काळे, खासदार बजरंग सोनवणे, राजेश टोपे, आमदार संदीप क्षीरसागर, सलील देशमुख, सुनील भुसारा यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार रोहित पवार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून उद्या मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटी-शर्ती हटविण्याबाबत चर्चा करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “यापूर्वी पंढरपूरमध्ये दिलेला शब्द सरकारने पाळला नव्हता. तरीही मंत्रीपदाचा मान राखत पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवत हे आंदोलन स्थगित करत आहोत. आंदोलनामुळे अडकलेले सामान्य नागरिक आणि सकाळपासून बंदोबस्तासाठी रस्त्यावर असलेल्या पोलीस बांधवांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.”
तसेच त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा देत म्हटले की, “मंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे उद्या मुंबईत बैठकीचे नियोजन झाले पाहिजे. पुन्हा विश्वासघात झाला तर यापुढे त्यांच्यावर विश्वास ठेवला जाणार नाही. राज्यभर यापेक्षाही मोठे आंदोलन उभारून शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवून दिली जाईल.” असा इशारा यावेळी त्यांनी दिला. याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घे
तला.
What's Your Reaction?