अटकेच्या मागणीसाठी आंदोलक युवक अक्रामक, दिल्लीगेट रस्ता केला जाम, विभागीय आयुक्तांकडे निवेदन सादर

 0
अटकेच्या मागणीसाठी आंदोलक युवक अक्रामक, दिल्लीगेट रस्ता केला जाम,  विभागीय आयुक्तांकडे निवेदन सादर

अटल समाज संघर्ष कृती समितीच्या आंदोलनाला ऑल इंडिया उलमा बोर्डसह अनेक संघटनांचा पाठिंबा; आंदोलनानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन

नाजिया इलाहीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन स्थळ सोडणार नाही असा पवित्रा युवकांनी घेतला. अर्धा तास दिल्लीगेट रस्ता अडवून धरल्याने पोलिसांना रस्त्याचा श्वास मोकळा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. विभागीय आयुक्त यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे उचित कायदेशीर कारवाई केली जात आहे युवकांनी शांततेत येथून निघून जावे असे आवाहन अक्रामक झालेल्या आंदोलकांना पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी केले यानंतर गर्दी ओसरली त्यानंतर खोळंबलेली वाहतूक पूर्ववत झाली. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)- सोशल मीडियावर इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद (स.अ.व.) तसेच उम्मुल मोमिनीन हजरत आयेशा (र.अ.) यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अटल समाज संघर्ष कृती समितीच्या वतीने सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला ऑल इंडिया उलमा बोर्ड (वक्फ विंग महाराष्ट्र) यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता.

दुपारी 2 ते 5 या वेळेत झालेल्या आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर प्रतिनिधी मंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करून नाझिया इलाही खान यांच्याविरोधात तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

निवेदनात नाझिया इलाही खान यांना अटक करून त्यांच्यावर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कथित वक्तव्यांची सखोल चौकशी करून कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. धार्मिक भावना दुखावणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रशासनाने तातडीने आणि निष्पक्ष कारवाई करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी शेख आसिफ महेबूब, अशरफ पठाण, सैय्यद शहाबुद्दीन, नासेर सिद्दीकी, समीर साजिद बिल्डर, अलीम बेग, नजीर फारुकी, जी. एम. कादरी, हुसैन पठाण, मोहसीन खान यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी धार्मिक भावना दुखावणाऱ्या कथित वक्तव्यांविरोधात लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजात शांतता, सलोखा आणि परस्पर आदर कायम राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित व प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. धर्मगुरु यांच्या विरोधात नेहमी बेताल वक्तव्य किंवा टिप्पणी केली जात आहे याला आळा घालण्यासाठी पावसाळी अधिवेशनात कडक कायदा बनवला पाहिजे की दोषींवर कठोर कारवाई होईल अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि शाजियाच्या निषेधार्थ कटकट गेट व शहरातील काही बाजारपेठ बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती मुनव्वर अन्सारी यां

नी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow