सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती बी.आर.गवई यांचे शहरात आगमन....
 
                                 
 
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांचे छत्रपती संभाजी नगर येथे आगमन व स्वागत...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि. 26(डि-24 न्यूज)-सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांचे आज दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास येथील विमानतळावर आगमन झाले.
प्रशासनातर्फे विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे,उच्च न्यायालय प्रबंधक एस.एस.अडकर, विमलनाथ तिवारी, विधी व न्याय विभागाचे सह सचिव एस.एस. पल्लोड, विलास गायकवाड, शासकीय अभियोक्ता अमरजितसिंग गिरासे
तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते. यावेळी त्यांना पोलीस मानवंदना देण्यात आली.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            