सावधान... कोरोना डोके वर काढतोय, चार वर्षांची चिमुकली कोरोना पाॅझिटीव
सावधान... कोरोना डोके वर काढतोय, चार वर्षांची चिमुकली कोरोना पाॅझिटीव
औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) वाळूज येथील या चिमुकलीवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सर्दी, खोकला झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोना टेस्ट करण्यात आली असता त्यात चिमुकली पाॅझिटीव्ह आढळली. मनपा आरोग्य विभागाच्या पथकाने रुग्णालयात जाऊन चिमुकलीची माहिती घेऊन तिच्या आईवडीलांची कोरोना चाचणी केली. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. असे असले तरी सर्वांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याची सूचना करण्यात आली असल्याचे मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत राठोड यांनी सांगितले.
What's Your Reaction?