सिडकोत भरदिवसा घरफोडी... साडेचार लाखांचे दागिने रोख रक्कम लंपास
सिडकोत भरदिवसा घरफोडी, साडेचार लाख रुपयांचे दागिने रोख रक्कम लंपास...
औरंगाबाद,दि.24 (डि-24 न्यूज) शहरात चोरीचे सत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. चोरट्यांनी भरदिवसा एका व्यापाऱ्याचे घर फोडून रोख रकमेसह,सोन्या चांदिचे दागिने असा एकूण 4 लाख 50 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना सिडकोतील संत तुकोबा नगरात घडली. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
सिडको एन-2, संत तुकोबानगरातील व्यापारी आनंद शिवाजी कदम (27) हे गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरास कुलूप लावून परिवारासह सातारा परिसरातील एका कार्यक्रमात गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करत बेडरूममधील कपाटातून 25 हजारांच्या रोख रकमेसह 4 लाख 50 हजार 285 रुपयांचे दागिने लंपास केले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कदम कुटुंबीय घरी परतले असता ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सहायक आयुक्त रणजित पाटील यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. ही घटना गुरुवारी दुपारी 5 ते 5 वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी रात्री उशिरा 11.52 मिनिटांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे करत आहेत.
What's Your Reaction?