सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातून शेख कडू उर्फ इमानभाई
 
                                सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातून शेख कडू उर्फ इमानभाई
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा हा मतदारसंघ असल्याने अधिक महत्त्व आहे. त्यांना या निवडणुकीत आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून शेख कडू शेख मोईनोद्दीन(इमान भाई) यांनी उमेदवारी मागितली आहे. या मतदारसंघातून उबाठाच्या वतीने दावा केला जात आहे परंतु नेहमी हि जागा काँग्रेसने लढली आहे. यासाठी पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली आहे. मतदारांचाही त्यांना पाठिंबा मिळत आहे. या मतदारसंघात शेख कडू यांनी भेटीगाठी घेऊन प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अपेक्षा आहे की त्यांना काँग्रेसचे तिकीट मिळेल. मागिल अनेक वर्षांपासून ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. कार्यकर्त्यांची सुध्दा त्यांना साथ मिळत आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            