सील केलेल्या मालमत्ता धारकाविरुध्द सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 0
सील केलेल्या मालमत्ता धारकाविरुध्द सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सील केलेल्या मालमत्ता धारका विरुद्ध गुन्हा दाखल...

कर न भरताच सील तोडले...

आयुक्त स्वतः कारवाई साठी उतरले...

नियम मोडाल तर कारवाईलां सामोरे जा मनपा प्रशासनाचा इशारा....

औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) झोन क्र.१ अंतर्गत वार्ड क्र.१२ लोटाकारंजा वार्डातील झवेरी मार्केट, सराफा येथील मूळ मालक मालमत्ताधारक विठ्ठलदास जव्हेरी यांचे नावे आजही नामांतर न केल्याने नोंद आहे त्या ही मिळकत अरबाज खान याना विकली आणि येथील भाडेकरु अब्दुल रफीक अब्दुल गफार, याना वेळोवेळी कर भरावा म्हणून नोटिस देण्यात आल्या होत्या परंतु संबंधितानी कर भरला नाही म्हणून शॉप नं.१ आणि २, मालमत्ता क्र.ए-००२५९७८, थकीत मालमत्ता कर रक्कम रु.१,५९,३८०/- तसेच ग्राउंड फ्लोअरचे शॉप नं.१.२ आणि ३ मालमत्ता क्र.१-००२५९८६ थकीत मालमत्ता कर रक्कम रु.२,३३,८७८/- असे येणे बाकी असल्याने टास्क फोर्स झोन क्रं.१. पथकाने सहायक आयुक्त संजय सुरडकर यांच्या नेतृत्वात दि.२६.०३.२०२४ रोजी सकाळ सत्रात एकूण पाच दुकाने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उप आयुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सील केले होते.

दुपार सत्रात या भागात मनपाचे वसुली कर्मचारी वसुली करतांना सदर पाच दुकानाचे सील परस्पर तोडल्याचे त्यांचे निदर्शनास आले. याच दिवशी सायंकाळी पंचनामा केला असता सदर पाच दुकाने अरबाज खान यांनी तोडले असल्याचे भाडेकरू संदिप कुशवाह यांनी पथकाच्या निदर्शनास आणून दिले.

दि.२७.०६.२०२४ रोजी सकाळ सत्रात टास्क फोर्सव्या पथकाने वरील ५ दुकाने पुन्हा सील केले. दि.०३.०३.२०२४ रोजी प्रशासक यांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली संदर्भात आढावा बैठक घेतली असता उपायुक्त अपर्णा थेटे व सहायक आयुक्त संजय सुरडकर यांनी बैठकीत सदरची ५ दुकानांचे परस्पर सील तोडल्याबाबत प्रशासक महोदय यांच्या निर्दशनास आणून दिले असता संबंधित अरबाज खान यांच्या विरुध्द पोलिस स्टेशनला एफ.आय.आर. दाखल करण्यांचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने सायंकाळी सिटी चौक पोलिस स्टेशनला अरबाज खान यांच्याविरुध्द एफ. आय. आर. दाखल करण्यांत आला.

प्रशासक स्वतः उतरले कारवाई करिता

आज दि ०४ एप्रिल रोजी मा. प्रशासक महोदय यांनी जव्हेरी मार्केट येथे सकाळी ११.३० वाजता या दुकानांची पाहणी केली असता अरबाज खान यांना ताकीद देऊन सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत थकीत मालमत्ता कर भरण्यास सांगितले अन्यथा कारवाईलां सामोरे जावे लागेल असे आदेश दिले. 

या बाबत प्रशासक महोदयांनी आढावा घेतला असता संबंधितांनी अद्याप कर भरला नसल्याचे त्यांचे निदर्शनास आले. या अनुषंगाने प्रशासक यांनी अरबाज खान यांनी थकीत मालमत्ता कराचा भरणा केला नसल्यास सदरची ५ दुकाने पुन्हा सील करण्यांत यावी, असे निर्देश दिले. या नुसार सदर दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली. सदर दुकानांचे पुन्हा सील उघडण्यात येणार नाही अशी तंबी आयुक्त महोदयांनी सबंधित मिळकत धारकला दिली. अशी माहिती उप आयुक्त कर या विभागाकडून देण्यात आली आहे.

या अगोदर प्रशासक स्वतः सिल्लेखाना येथे मनपा घंटागाडी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या नागरिकाच्या घरी गेले होते व याचा जाब विचारला होता. आज परत एकदा नियमाचे उल्लंघन केल्यास प्रशासन काय पाऊल उचलू शकते याचा प्रत्यय आला आहे. या नंतर कोणीही कोणत्याही नियमाचे उल्लंघन करू नये नसता कारवाईलां सामोरे जाण्यासाठी तयार राहावे असे मनपा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow