सुक्ष्म, लघु उद्योगांना सुयोग्य पद्धतीने भुखंड वाटप करा - उद्योगमंत्री उदय सामंत

 0
सुक्ष्म, लघु उद्योगांना सुयोग्य पद्धतीने भुखंड वाटप करा - उद्योगमंत्री उदय सामंत

उद्योग संघटनाशी चर्चा;

सूक्ष्म, लघु उद्योगांना सुयोग्य पद्धतीने भूखंड वाटप करा-उद्योग मंत्री उदय सामंत

छत्रपती संभाजीनगर, दि. 24(डि-24 न्यूज)- शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीत सूक्ष्म व लघु उद्योगांना समन्यायी व सुयोग्य पद्धतीने भूखंड उपलब्ध करून द्यावे,असे निर्देश उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.

येथील ऑरिक सिटी सभागृहात उद्योग मंत्री सामंत यांनी उद्योग संघटनाशी संवाद साधला. बैठकीत उद्योजकांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. 

खा. संदीपान भुमरे, आ. रमेश बोरनारे, आ. अनुराधा चव्हाण, आ. विलास भुमरे,उपमहापौर राजेंद्र जंजाळ, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मर्या. चे व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळच्या सह. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य अभियंता राहुल बनसोड, अधीक्षक अभियंता रमेशचंद्र गिरी, प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, उप अभियंता नितिन जाधव, कार्यकारी अभियंता नागोराव राठोड,महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मर्या. चे प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना तसेच उद्योग संघटनाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

चिकलठाणा, वाळूज,शेंद्रा व बिडकीन औद्योगिक क्षेत्रात ट्रक टर्मीनस सुरु करण्यात यावे, अशी मागणी उद्योजकांनी केली. त्यावर श्री. सामंत यांनी सांगितले की, संघटनानी सहभाग द्यावा व ट्रक टर्मिनस उभारावे. सहयोग तत्वावर चालवावे, असे श्री. सामंत यांनी शेतकऱ्यांना सांगितले. उद्योजकांच्या वीज पुरवठ्याच्या मागणी बाबत श्री.सामंत म्हणाले की, यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी औद्योगिक वसाहतीतील वीज वितरणाचा प्राधान्यक्रम ठरवून द्यावा. शेंद्रा बिडकीन वसाहतीत सूक्ष्म, लघु उद्योगंना भूखंड देण्याबाबत त्वरित निर्णय घेऊन, उच्चतम दर निश्चिती करावी, जेणेकरून उद्योजकांना भूखंड घेता येतील. तसेच एक्झिबीशन सेंटरच्या कामाला गती द्यावी, असे निर्देशही श्री. सामंत यांनी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow