सुरतहून राज्यात नशेच्या गोळ्या व औषधांचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी अटक...!
सुरतहून राज्यात नशेच्या गोळ्या व औषधांचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी जेरबंद
अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर कृती विभागाची मोठी कारवाई
छत्रपती संभाजीनगर : राज्यात अवैध ड्रग्ज विक्री, वितरण, वाहतूक आणि तस्करीविरोधात स्थापन करण्यात आलेल्या अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने आणखी एक मोठी कारवाई करत गुजरातमधील सुरत येथून राज्यात नशेच्या गोळ्या व औषधांचा पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील छावणी पोलीस ठाणे आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एनडीपीएस कायद्यान्वये गुन्ह्यांच्या तपासादरम्यान एकूण 19 लाख 53 हजार 298 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यामध्ये Nitrazepam Tablet I.P. 10 mg (AADPAM-10) कंपनीच्या 4,400 गोळ्या, Kaimodin-T (Codein Phosphate and Triprolidine Hydrochloride Cough Linctus) या औषधाच्या 100 मिलीच्या 118 बाटल्या, तसेच R-COFF-CT (Codein Phosphate and Triprolidine Hydrochloride Syrup) या औषधाच्या 100 मिलीच्या 14 बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या.
या प्रकरणात यापूर्वी सय्यद असर सय्यद अकबर (रा. चांदमारी, छावणी, छत्रपती संभाजीनगर), तौफिक रशीद अली (रा. हारुन मसालावाले), अजमत अहमद बेग (रा. शितल चार रस्ता, सुभाषनगर, सुरत), रमेश गोमाराम चोधरी (रा. गोवर्धन रोड, पालनपूर गाव, सुरत), विरुभाई लाठिया (रा. सुरत, गुजरात) आणि अदनान कापडिया (रा. सुरत, गुजरात) यांना अटक करण्यात आली होती.
तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सुरत येथून आणला जात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर टास्क फोर्सचे पथक सुरत येथे रवाना झाले. तेथे सखोल तपास करून नशेच्या गोळ्या व औषधांचा अवैध पुरवठा करणारा इसम मुनाफ इक्बाल शेख (वय 40, रा. होडी बंगला, घर क्र. 203, बिल्डिंग जहीन पॅलेस, सुरत, गुजरात) याला अटक करण्यात आली. आरोपी हा गुजरातमधील अरिहंत फार्मा या कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने आरोपीला 25 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योती प्रियासिंग, पोलीस उपमहानिरीक्षक प्रविणकुमार पाटील, पोलीस अधीक्षक अजित टिके आणि पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस निरीक्षक सचिन काळे, सपोनि विजय जगदाळे, सपोनि दिपाली पाटील, सपोनि विश्वास शिंदे, पोहवा कैलास गाडेकर, पोहवा रविंद्र साळवे, नितीन जाधव, साईनाथ आगिवाले, सतीश पाटील, पोअं अतुल तुपे, राहुल साळवे, सुरज जौनवल, हरीश मुंडे, ज्ञानेश्वर चव्हाण, अमित ठाकूर, ज्ञानेश्वर शेलार, मपोअं ज्योती किर्तीकर आणि आम्रपाली सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.
अमली पदार्थांची तस्करी, विक्री, वाहतूक किंवा लागवड करणाऱ्यांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे (मो. 9922928733) किंवा पोलीस निरीक्षक गीता बागवडे (मो. 8698256089) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर कृती विभागाने केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
What's Your Reaction?