सुरेवाडी, मयुरपार्क, भगतसिंगनगर येथे प्रदिप जैस्वाल यांच्या प्रचाराचा झंझावात
 
                                सुरेवाडी, मयूरपार्क, भगतसिंगनगर परिसरात प्रदीप जैस्वाल यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद, जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.6(डि-24 न्यूज) महायुतीचे औरंगाबाद मध्य मतदार संघातील उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या पदयात्रेला सुरेवाडी, मयूरपार्क आणि भगतसिंगनगर परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी प्रदीप जैस्वाल यांचा जोरदार प्रचार केला.
सुरेवाडी येथील हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन प्रदीप जैस्वाल यांनी आपल्या पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी स्थानिक नागरिकांसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत प्रदीप जैस्वाल यांचा प्रचार केला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाके फोडत, जोरदार घोषणाबाजी करत ही पदयात्रा पुढे सरकत होती. पदयात्रे दरम्यान महिलांनी प्रदीप जैस्वाल यांचे औक्षण करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदीप जैस्वाल यांनी 5 वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती नागरिकांना दिली. तसेच आगामी काळात देखील महायुती सरकार विकासासाठीच काम करणार असल्याची खात्री दिली. यावेळी नागरिकांनी देखील त्यांना चांगला प्रतिसाद दिला. शेकडोच्या संख्येने महायुतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. एकंदरीतच प्रदीप जैस्वाल यांच्या बद्दल मतदार संघात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र दिसून आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख, शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत, राष्ट्रवादीचे दत्ता भांगे, शेख रफिक, शेख कय्युम यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित हो
 
ते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            