सुरेश चव्हाणांवर मोका लावा, कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची छावाची मागणी

सुरेश चव्हाणांवर मोका लावा, कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची छावाची मागणी
क्रांतीचौकात छावाचे तीव्र आंदोलन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) -
लातूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन दिल्यानंतर छावाचे प्रदेशाध्यक्ष घाडगे पाटील यांच्यावर सुरेश चव्हाण सहीत कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यानंतर राज्यात छावा संघटना अक्रामक झाली आहे. क्रांतीचौकात राष्ट्रवादीच्या विरोधात छावाने तीव्र निदर्शने करत घटनेचा निषेध केला. प्रो.चंद्रकांत भराट, सुनील कोटकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.
कृषीमंत्री काशिनाथ कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, सुरेश चव्हाण व हल्ला करणा-या कार्यकर्त्यांवर मोका अंतर्गत कार्यवाई करावी. सात दिवसांच्या आत कार्यवाई करावी नसता राज्यभर छावा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रा. चंद्रकांत भराट यांनी दिला आहे.
आंदोलनात छावाच्या कार्यकर्त्यांनी पत्त्यांचा कॅट दाखवत कृषीमंत्र्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध केला.
What's Your Reaction?






