सुलीभंजन तलावात बुडून युवकाचा दुर्देवी मृत्यू...!

 0
सुलीभंजन तलावात बुडून युवकाचा दुर्देवी मृत्यू...!

सुलीभंजन तलावात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू...

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढला...

 छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)- खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांपैकी एका युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चार युवक सुलीभंजन तलावात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने एक युवक खोल पाण्यात जाऊन बुडाला. त्याच्यासोबत असलेल्या इतर तीन युवकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

घटनेची माहिती खुलताबाद पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल श्री. सदावर्ते यांनी अग्निशमन नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच पदमपुरा येथील मुख्य अग्निशमन केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम राबवत तलावात बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढून खुलताबाद पोलिसांच्या ताब्यात दिला.

मृत युवकाचे नाव मनोज भाऊसाहेब साठे (वय २६ वर्षे) असे असून तो छत्रपतीनगर, बजाजनगर, वाळूज येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

ही बचाव मोहीम मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उप अग्निशमन केंद्र अधिकारी व्ही. के. राठोड, ड्युटी अधिकारी दीपराज गंगावणे, अग्निशामक जवान संग्राम मोरे, अजिंक्य भगत, मनसुख सपकाळ, प्रणाल सूर्यवंशी तसेच वाहन चालक अजय कोल्हे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी जलाशयांमध्ये पोहताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow