सौदी अरेबियात चंद्रदर्शन, उद्या भारतात दिसण्याची शक्यता....!
 
                                सौदी अरेबियात चंद्रदर्शन, उद्या भारतात दिसण्याची शक्यता...!
औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) आज रविवारी सौदी अरेबियात चंद्रदर्शन झाल्याने आजपासून पवित्र रमजान महिना सुरू झाला असून उद्या 11 मार्चपासून रोजे सुरू होणार आहे. आजपासून सौदी अरेबियात नमाज-ए-तरावीह सुरू झाली आहे. उद्या सोमवारी भारतात चंद्रदर्शन होण्याची शक्यता आहे. दारुल कजा, इमारते शरीयाह मराठवाडा अध्यक्ष मुफ्ती मोईजोद्दीन कासमी यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले आहे की उद्या चंद्रदर्शन करावे. चंद्रदर्शन झाले तर उद्या तरावीहची नमाज होईल व पवित्र रमजान महिना सुरू होईल. मंगळवारपासून रोजे सुरू होईल. पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजात महीनाभर रोजे पकडले जातात व तरावीहची नमाज पठण केली जाते. जकात काढली जाते.
चंद्रदर्शन झाले किंवा नाही दारुल कजाने या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा 9156725624, 97622104044, 7020407544, 9850144511, 8446984748, 9023684551 असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            