स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वी उडणार... सर्वोच्च न्यायालयाचे आदेश...!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वी उडणार... सर्वोच्च न्यायालयाचे आदेश...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील चार महिन्यांच्या आत घ्या असे आदेश आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार व निवडणूक आयोगाला दिले आहे. न्यायालयाने या निवडणुकांची अधिसूचना चार आठवड्यांच्या आत काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती निवडणूकांचा बार दिवाळीपूर्वी उडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नांदेड, लातूर, जालना, नागपूर व अन्य महापालिका व जिल्हा परिषदेचे कामकाज प्रशासक बघत आहे. सन 2020 पासून छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) महापालिकेवर प्रशासक कामकाज बघत आहे. या महत्वपूर्ण निकालामुळे इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागतील अशी शक्यता आहे. निवडणूकीचे वारे पुन्हा या निकालामुळे वाहू लागतील.
What's Your Reaction?






