स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जिंकण्यासाठी लढायच्या, शिवसेनेचा निर्धार...
 
                                स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या...
पूर्व विधानसभा महिला आघाडीच्या बैठकीत रविंद्र मिर्लेकर यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16 (डि-24 न्यूज) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षास जिंकण्यासाठी लढायच्या असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले. संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आज शहरातील मातृभूमी प्रतिष्ठान संपर्क कार्यालय येथे बैठक संपन्न झाली, त्यावेळेस ते बोलत होते.
महिला आघाडीच्या पदाधिकारी प्रामाणिक आणि निष्ठेने काम करतात. फक्त त्यांना आपले सामर्थ्य ओळखता आले पाहिजे, अशी भावना व्यक्त करत संघटन मजबूत असेल तर समोर निर्माण झालेले कोणतेही आव्हान पक्ष त्यास सामोरे जाऊ शकतो, अशी भूमिका मिर्लेकर यांनी या बैठकीत मांडली. याप्रसंगी निरीक्षक प्रदीप कुमार खोपडे व महानगरप्रमुख राजू वैद्य यांनीही बैठकीस संबोधित केले.
याप्रसंगी महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनिता देव, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, महानगर संघटक सुकन्या भोसले, शहर संघटक सुनीता औताडे, विधानसभा समन्वयक अंजना गवई, उपशहर संघटक पद्मा तुपे, राजश्री पोफळे, रेखा फलके, मीना थोरवे, शोभा साबळे, सीमा गवळी, कविता मठपती, नुसरत जहाँ, मनिषा खरे, विभाग संघटक पंचकला काळे, मनिषा बिराजदार, नंदा काळवणे, कावेरी मेटे, रुपाली मुंदडा, छाया देवराज व अरुणा कवडे उपस्थित होत्या.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            