स्मार्ट मीटर व वीज दरवाढ विरोधात भाकपचे पुन्हा आंदोलन...

 0
स्मार्ट मीटर व वीज दरवाढ विरोधात भाकपचे पुन्हा आंदोलन...

स्मार्ट मीटर व वीज दर वाढी विरोधात भाकपचे पुन्हा आंदोलन 

दिनांक 8 ऑक्टोबर 2025 बुधवार रोजी पुन्हा निदर्शने करणार... !

छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) - दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी ठरल्याप्रमाणे आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महावितरण जुबली पार्क कार्यालयासमोर स्मार्ट मीटर व वीज दरवाढी विरोधात तीव्र निदर्शने केली. 

 लोकांचा विरोध असतांना जबरदस्ती व गुपचूप स्मार्ट मीटर लावू नका या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सह व्यवस्थापकीय संचालक महावितरण जुबली पार्क , कार्यालयासमोर निदर्शने केली. 

  स्मार्ट मीटर लावले जाणार नाहीत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले असले तरी प्रत्यक्षात मात्र गुपचूप व जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्याचा धडाका महावितरण ने लावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणाचा निषेधही या निदर्शनात करण्यात आला. ठिकठिकाणी स्मार्ट मीटर ला विरोध होत असतानाही जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावले जात आहेत. अनेक ठिकाणी लोक स्मार्ट मीटर लावणाऱ्या कंपनीच्या लोकांना हाकलून देत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ठरविल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी 10 वाजता निदर्शने केली जात आहेत. 

 एनसीसी कंपनीचे कंत्राट रद्द करावे , जबरदस्ती व गुपचूप लावलेले स्मार्ट मीटर तत्काळ काढून घ्यावे व त्या ठिकाणी जुने मीटर लावावे यावेळी इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

त्यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. पुन्हा दि. 8 ऑक्टोबर 2025 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता पुन्हा निदर्शने करण्यात येतील असाही निर्णय घेण्यात आला. स्मार्ट मीटर व वीस दरवाढी विरोधात आंदोलनात येणे किंवा लाखो रुपयांचे वीज बिल भरणे यापैकी एक पर्याय लोकांना निवडावा लागणार आहे त्यामुळे पहिला पर्यायच लोकांनी निवडून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी दहा वाजता जुबली पार्क येथील कार्यालयासमोर निदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहन भाकपाने केले आहे 

   निवेदनात 

छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर , दादा कॉलनी , शंभू नगर , भावसिंगपूरा, वाळूज , एकता नगर, बीड बायपास व शहरातील इतर भागात गुपचुप व जबरदस्तीने लावलेले स्मार्ट मिटर तातडीने काढून घ्या व पूर्वीचे जुने मिटर तात्काळ लावा , 

छत्रपती संभाजीनगरच्या लोकांची परवानगी नसतांना चलाखी करुन , गुपचुप तसेच अनेकांचे फॉल्टी मिटर नसतांना फॉल्टी मिटरच्या नावाखाली जुने मिटर घेवुन जायचे आणि बदमाशीने स्मार्ट मिटर लावायचे तसेच नविन कनेक्शन देत असतांनाही जबरदस्तीने जुन्या पध्दतीचे मिटर नाहीत असे सांगुन स्मार्ट मिटरच घ्यावे लागेले अशी हुकुमशाही , जबरदस्ती करुन स्मार्ट मिटर जनतेला लुटण्यासाठी लावायचे हा प्रकार थांबला पाहीजे व ज्या ठिकाणी अशा पध्दतीने स्मार्ट मिटर लावले आहेत ते तातडीने काढुन घेतले पाहीजे . 

छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी कार्यालये व सरकारी निवासस्थानावर लावलेले स्मार्ट मिटरही तातडीने काढुन घेतले पाहीजे . 

 टीओडी पध्दतीची वीज नियामक आयोगांनी केस नंबर 217/2024 अंतर्गत मंजूर केलेली छुपी व प्रचंड प्रमाणातील वीज दरवाढ कायमची रद्द करा . 

 एप्रिल 2024 च्या वीजदरापेक्षाही अर्ध्यापेक्षा कमी वीज दर करा . 

 मराठवाडयावर अन्याय करणारी छत्रपती संभाजीनगरची भेदभाव पूर्ण लोड शेडींग बंद करा .

 सेक्यूरिटी डिपॉझीटच्या नावाने करत असलेली लूट बंद करा

 स्मार्ट मीटरचे कंत्राट रद्द करा.

 स्मार्ट मीटर विजेच्या धक्क्यामुळे जखमी आचल अस्वले वय आठ वर्ष हीच एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्या.

या मागण्यांचा समावेश आहे . . 

 याबाबत विविध पक्ष संघटनांची कृती समिती करून कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. 

 यावेळी भाकप राज्य कौन्सिल सदस्य व शहर सेक्रेटरी ॲड . अभय टाकसाळ , कॉम्रेड जफर फजलू रहमान, कॉ. राजू हिवराळे, कॉ रफीक बक्श , एजाज शेख, ॴबेडकरी दलीत पॅंथरचे कीरन तुपे, भीमशक्ती संघटनेचे अॅड.अमोल वाकेकर, उबाठाचे सलीम खामगावकर, लाल बावटा रिक्षा युनियन चे अमजद खान, फेरोज खान, 

प्रमिला रत्नपाखरे, मनिषा सातपुते, गौसिया शेख, सविता घागरे, वनिता सातदिवे, अमित भालेराव , अझहर शेख , गौतम शिरसाठे, श्रीयोग वाघमारे ,बंटी खरात, प्रमोद नाडे, ऋषिकेश रूपेकर, श्रीक्रांत बनसोडे, दिपक मगर, अतिश दांडगे, अभिजित बनसोडे , समीर म्हस्के , समाधान पारधे, शेख अमजद , , संतोष काळे , एजाज शेख, शेख नुर , फकीरचंद थोरात

यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow