हज हाऊस समोर काँग्रेसचा राडा, आंदोलक नेत्यासहीत कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात...!
हज हाऊस येथे सरकारी कार्यालय न येण्यासाठी केलेल्या आंदोलनात शेख युसूफ यांच्या सहित अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांना अटक , यानंतर अल्पसंख्याक आयुक्तालयाचे उद्घाटन उरकण्यात आले....
छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.26(डि-24 न्यूज ) अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयुक्त कार्यालय हे हज हाऊस येथे प्रशासकीय कामासाठी वापरत आहे याचा खरा उद्देश धार्मिक उपयोगासाठी व्हावा. मराठवाडयातून येणा-या हज भाविकांसाठी त्यांना राहण्यासाठी, ट्रेनिग साठी हज हाऊस येथे तयार केले परंतु तसे न करता अल्पसंख्याक मंत्रालयाने येथे अल्पसंख्याक आयुक्त कार्यालय उघडण्यात आले आहे. त्याला विरोध म्हणून शहर जिल्हा काँगेस कमिटीच्या वतीने लक्षवेधी लोकशाही मार्गाने आंदोलन हज हाऊस किलेअर्क येथे करण्यात आले. आंदोलन करतांना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्यासहित पदाधिका-यांना अटक करण्यात आली.
या वेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, माजी शहर अध्यक्ष सयद अक्रम, शहर महिला अध्यक्षा दिपाली मिसाळ, अनिस पटेल, डॉ.अरुण शिरसाठ, डॉ.निलेश अंबेवाडीकर, भाऊसाहेब जगताप,उमाकांत खोतकर, महेंद्र रमंडवाल, वैâसर बाबा, अनिता भंडारी, रेखा राऊत, प्रविणबाजी देशमुख, विदया लांडगे, मोईन हाजी कुरैशी, इरफार खान गुलाब खान, हकीम पटेल, सुमित नन्नावरे, बबन डिंडोरे पाटील, शफिक शहा, शकुंतला साबळे,चंद्रप्रभा खंदारे, सलीम खान, सयद फयाजोददीन, फैज शेख, श्रीकृष्ण काकडे, सयद युनुस,अभिषेक शिंदे, नदीम शेख, आसमत खान, लियाकत पठाण, जकी मिर्झा, मुददसिर अन्सारी,आमेर रफिक खान, आकेफ रजवी,हेमंत, आमजद खान,राहुल सावंत़,आकाश रगडे, उत्तम दणके, चंक्रधर मगरे, आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?