हिमायतबाग रस्त्यावरील ट्रक चालकांवर दंडात्मक कार्यवाई
 
                                हिमायत बाग रस्त्यावरील ट्रक वरती कारवाई
जागेवरून ट्रक हटवा अन्यथा जप्ती चा इशारा
शहागंज येथून हटवून हिमायतबाग येथे कॅनटरचालकांना दिली होती गाड्या उभ्या करण्यासाठी जागा...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)
शहरातील हिमायत बाग ते दिल्ली गेट या रस्त्यावर अनधिकृतपणे ट्रक्स उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात येतो. आज या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायत बाग ते दिल्ली गेट रस्त्यावर अनधिकृतपणे उभे असलेले सहा चाकी ट्रक वरती दंडात्मक कारवाई करण्यात आली. या ट्रक्स मुळे सतत वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या .या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या निर्देशानुसार ट्रॅफिक वॉर्डन यांनी एकूण 8 ट्रक चालक मालक यांचे वरती दंडात्मक कारवाई करून 12 हजार रुपये दंड वसूल केला. या अगोदर सबंधित वाहन धारकाना वेळोवेळी वाहने हटविणे बाबत सूचना देण्यात आल्या होत्या परंतु सदर ठिकाणांहून वाहने न हटविल्यामुळे आज ही कारवाई करण्यात आली. तसेच या ठिकाणी असलेले वाहने तत्काळ हटविण्यात यावे अन्यथा या नंतर वाहने जप्त करून आरटीओ कार्यालयात जमा करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या. या कारवाई वेळी वाहन निरीक्षक आरटीओ कार्यालय श्री शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली व वाहनधारकांना अनधिकृतपणे उभे करण्यात आलेले आपले वाहने हटविण्याच्या सूचना दिल्या अन्यथा सदर वाहने जप्त होऊन आरटीओ कार्यालयात जमा करण्यात येतील असा इशारा दिला.
सदर कारवाई नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव ,नागरी मित्र पथक व ट्रॅफिक वॉर्डन यांच्या पथकाने केली.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            