हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या आमदारांचा सभात्याग
 
                                सभागृहात सभापतींचा एकांगीपणा
विरोधकांना दाऊद प्रकरणी बोलण्यास मज्जाव केल्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
नागपूर,दि.18(डि-24 न्यूज) विरोधकांनी आज परिषद सभागृहात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम
याच्या जवळील इब्राहिम कासकर याच्या घरातील लग्नाला भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी हजर असल्याची 289 अनव्ये
चर्चा उपस्थित केली असता, सभापती यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधकांना बोलण्यास मज्जाव केला, त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
नाशिक मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या जवळील इब्राहिम कासकर याच्या घरातील लग्नाला भाजपचे मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमाताई हिरे आदी हजर होते. एकीकडे सत्ताधारी विरोधकांना सतत हिंदुत्ववादावरून टीका करत असतात. मात्र देशद्रोही असलेल्या दाऊदच्या घरच्या लग्नाला त्यांचेच मंत्री, आमदार व पदाधिकारी हजेरी लावतात, ही बाब गंभीर असल्याचे म्हणत या सर्वांचे फोटो दाखवत विरोधकांनी यावर 289 अनव्ये सभागृहात चर्चा उपस्थित केली. मात्र सभापती यांनी विरोधकांची भूमिका ऐकून घेतली नाही. तसेच सभापती या एककल्लीपणे सभागृह चालवत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला.
सभागृहात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री यांनी येऊन यावर खुलासा करण्याचा प्रयत्न केला.
मात्र रातोरात पत्रिका बदलण्यात आली असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.
देशद्रोही इकबाल मिरची याचे संबंध माजी खासदार प्रफुल पटेल यांच्याशी असलेले चालतं. आम्ही नवाब मालिक यांच्या विरोधात बोलल्यावर सरकार त्यांची बाजू घेत. एकप्रकारे सरकार हे दाऊदला साथ देत असून हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजपचा हा दुटप्पीपणा समोर आल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य व आमदार एकनाथ खडसे, आमदार भाई जगताप, आमदार बंटी पाटील, आमदार अनिल परब यांनी सभागृहात बोलण्याचा प्रयत्न केला असता सभापती यांनी त्यांना बोलण्यास मज्जाव केला.
289 हा विरोधकांचा प्रस्ताव असतानाही सभापती या नियमाप्रमाणे सभागृहाच कामकाज चालु देत नाही. एकांगीपणे सभागृह चालवितात. विरोधकांना प्रश्न विचारू देत नसल्यामुळे आम्ही आज सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार घातल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            