29 ऑगस्ट रोजीचा राज्य सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप तुर्तास पुढे ढकलला
29 ऑगस्ट रोजीचा राज्य सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप तूर्तास पुढे ढकलला
मुंबई, दि.28(डि-24 न्यूज) मुख्यमत्र्यांनी अर्थसंकल्पिय अधिवेशनात पटलावर ठेवलेल्या निवृती वेतनाची अधिसूचना त्वरीत काढून शासन निर्णय जाहिर करावा, या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने दि.29 ऑगस्ट पासून बेमुदत संपाचा इशारा शासनास दिला होता. याच विषयावर दि. 27/8/2024 रोजी मुख्यमंत्री यांचेशी प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा झाली. सदर चर्चेत राज्य शासनाने अर्थसंक्ल्पिय अधिवेशनात पटलावर ठेवल्यानुसारच सुधारीत निवृतीवेतन योजना राबविली जाईल, असे अभिवचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले, तसेच इतर विषयांबाबत निर्णायक चर्चा, सध्याच्या माझ्या व्यस्ततेमुळे दोन तीन दिवसांनंतर संपन्न होईल, असे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या वरील अभिवचनानंतर दि. 27.8.2024 रोजी संपन्न झालेल्या समन्वय समितीच्या आणि दि. 28/8/2024 रोजी संपन्न झालेल्या सुकाणू समितीच्या सभेत, मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केल्यानुसार अपेक्षित निर्णय घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देणे, योग्य होईल, असा ठराव मंजूर केला.
वरील ठरावानंतर दि. 29 ऑगस्टच्या नियोजित बेमुदत संपाची बदललेली पुढील तारीख 4 सप्टेंबर रोजी समन्वय समितीची विस्तारीत सभा पुन्हा घेऊन, ठरविण्यात येईल, असा निर्णय घेऊन दि. 29 ऑगस्ट पासूनचा बेमुदत संप तूर्तास पुढे ढकलण्यात येत आहे. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे महाराष्ट्र समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली आहे.
What's Your Reaction?