4 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, लिंबे जळगावात शोककळा...

 0
4 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, लिंबे जळगावात शोककळा...

4 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, लिंबे जळगावात शोककळा...

दसऱ्यानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू... ह्रदयविदारक घटना वाळूज परिसरातील लिंबे जळगाव येथे दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली...

वाळूज, दि.2(डि-24 न्यूज)- 

वाळूज परिसरातील लिंबे जळगाव येथे मन हेलावून टाकणारी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. दस-यानिमित्ताने ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या 4 मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. सविस्तर माहिती अशी की वाळुज पोलीस

ठाण्याच्या हद्दीतील लिंबे जळगाव शिवारातील शेतात

राहणाऱ्या कुटूंबातील इम्रान इसाक शेख, वय 20 वर्षे हा

दसऱ्यानिमित्त आज गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शेतालगत असलेल्या टेंभापुरी धरणाच्या पाण्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला होता. त्याच्या सोबत त्याचे कुटुंबातील इम्मु इसाक पठाण वय 10 वर्षे, जैन बाबू पठाण वय 10 वर्षे व घराशेजारील मुलगा गौरव दत्तू तारक, वय 10 ही तीन लहान मुले होती. सर्व चौघांचाही ट्रॅक्टर धुताना पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बुडालेल्या चारही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना प्रथम शिवराइ टोल नाक्याजवळ सी एस एम एस एस हॉस्पिटल येथे व नंतर घाटी रुग्णालयात रवाना केले आहेत. या घटनेची माहिती मिळताच वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने, पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ खोसरे, पोलीस अंमलदार पांडुरंग शेळके, पोलीस अंमलदार स्वप्निल खाकरे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर

राऊत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात बुडालेल्या चौघांचाही मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह पोस्टमार्टम साठी घाटीत दाखल करण्यात आला. पुढील चौकशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ खोसरे करीत आहे. या घटनेनंतर लिंबे जळगाव व परिसरात शोककळा पसरली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow