7 उमेदवारांची माघार, 37 मैदानात, निकाल येण्यास लागणार उशिर...!
7 उमेदवारांची माघार, 37 मैदानात, निकाल येण्यास लागणार उशिर
औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) आज औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या दिवशी सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. 44 उमेदवार मैदानात होते त्यापैकी सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने मैदानात 37 उमेदवार मैदानात आहे. उमेदवार संख्या जास्त असल्याने एका मतदान केंद्रावर 3 बॅलेट युनिट, 1 कंट्रोल युनिट लागणार आहे. एकूण ईव्हीएम मशिन 7 हजार 344 लागणार आहे. उमेदवार मागिल निवडणुकीत 24 होते यावेळी 37 असल्याने निकाल येण्यास उशीर लागणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.
यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी यांनी पुढे सांगितले निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार पारदर्शक प्रक्रीया पार पडली. प्रत्येकाचे समाधान करून कामकाज झाले. ऑटो रिक्षा, रोड रोलर, कपाट या चिन्हांसाठी ड्रा करण्यात आला.
उमेदवारी अर्ज मागे घेणा-यांची नावे साहेबखान पठाण, खान एजाज अहेमद, मोहम्मद मोहसीन, विश्वासराव म्हस्के, गोरखनाथ राठोड, जियाऊलहक शेख, किरण बर्डे यांचा समावेश आहे.
तीन वाजेनंतर उमेदवारांना निरीक्षकांच्या उपस्थितीत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. एकच निशाणी दोन उमेदवारांनी मागितल्याने चिठ्ठी काढून निशाणी देण्यात आली असे तीन उमेदवार होते. पारदर्शकपणे डोळ्याला रुमाल बांधून सोडत काढण्यात आली.
19-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण मतदान केंद्र आहे 2021, मतदार संख्या आहे 1886294, सर्विस मतदार 1418, कन्नड-312278,
गंगापूर - 309288, वैजापूर- 307723, औरंगाबाद पूर्व- 306083,
औरंगाबाद मध्य-319745,
औरंगाबाद पश्चिम- 331176 मतदार संख्या आहे.
What's Your Reaction?