AIMIM, शाकेर खान यांच्याकडे औरंगाबाद पूर्वचे शहराध्यक्ष पद, नवीन टिमची घोषणा

 0
AIMIM, शाकेर खान यांच्याकडे औरंगाबाद पूर्वचे शहराध्यक्ष पद, नवीन टिमची घोषणा

शाकेर खान यांच्याकडे औरंगाबाद पूर्वचे शहराध्यक्षपद

नवीन दमदार टीमची घोषणा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 4 (डि-24 न्यूज) — हज हाऊसच्या सभागृहात एमआयएमच्या शहर कार्यकारिणीची घोषणा शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांनी केली. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

औरंगाबाद पूर्वच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले युवा नेते शाकेर खान यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या नेतृत्वाखालील नवीन दमदार टीमचीही घोषणा करण्यात आली.

या टीममध्ये फैजान रजवी, सय्यद करीम, निसार खान, शेख शेरू, शेख अक्रम आणि नदीम पटेल यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रदेश पदाधिकारी प्रभाकर पारधे, जिल्हाध्यक्ष शारेक नक्शबंदी, विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, गटनेते हाजी शेरखान, युवा जिल्हाध्यक्ष इद्रीस नवाब यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow