TCS प्रकरणात मीडीया ट्रायल सुरू, न्यायालयाचा निर्णय येवू द्या - बॅ.असदोद्दीन ओवेसी
TCS प्रकरणात मीडीया ट्रायल सुरू, न्यायालयाचा निर्णय येवू द्या नीदा खान निर्दोष सुटेल - बॅ.असदोद्दीन ओवेसी
विरोधकांकडून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू असा ओवेसींनी लावला आरोप...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- नाशिकच्या टिसीएस कंपनी प्रकरणात मीडीया ट्रायल सुरू आहे. टिसीएसने स्पष्टीकरण दिले आहे नीदा खान हि एच आर मॅनेजर नव्हती तीने कंपनी सोडलेली आहे. तीच्यावर एफ आय आर मध्ये भावना भडकावण्याचा आरोप करण्यात आला आहे धर्मांतराचा नाही. माध्यमांवर जे दाखवले जात आहे हे द्वेषाचे राजकारण आहे. तिच्याकडे सापडलेले बुरखा, मुस्लिम धार्मिक ग्रंथ मिळणे गुन्हा आहे का...? उच्चशिक्षित मुला मुलींना टार्गेट करुन भविष्य उध्वस्त करण्याचा षडयंत्र रचले जात आहे. मालेगाव, मुंबईत रेल्वेत जे ब्लास्ट झाले त्यामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले त्यामध्ये हिंदू मुस्लिम मारले गेले त्यांच्या कुटुंबियांना आतापर्यंत न्याय मिळाला का...? त्यांच्या कुटुंबियांना माध्यमांनी विचारले का...? मालेगाव केसमधील आरोपी असलेल्या खासदार बनून लोकसभेत पोहोचले. दिल्ली मध्ये आतंकवादी म्हणून तुरुंगात टाकलेल्या तरुणांना काही वर्षांनंतर न्यायालयाने सोडले. असे अनेक उदाहरणे आहेत. आरोप म्हणजे दोषी ठरत नाही. नीदा खानला अटक झाली आहे. पोलिस चौकशी करत आहे. आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. नीदा खानची निर्दोष मुक्तता होईल. एमआयएम वर जे आरोप केले जात आहे मी त्याचे खंडन करतो. नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर लापवल्याचा आरोप करण्यात आला तो चौकशीला सामोरे जाईल. राज्यातील अनेक आमदार खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाचे निर्णय येवू द्या पक्षाला विरोधक बदनाम करत आहे त्यांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मी तयार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रश्नांचे उत्तर देताना एमआयएमचे सुप्रीमो खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी सांगितले.
वंदे मातरम् बोलने देशातील नागरिकांना अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला या प्रश्नावर रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या पत्राचा हवाला देत केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. टागोर हे एक महान व्यक्ती होते. सध्याचे निर्णय घेणारे सत्ताधारी त्यांच्या हुन महान होऊ शकत नाही असा टोला त्यांनी लगावला.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, माजी आमदार वारीस पठाण उपस्थित होते.
एस आय आर वर एमआयएमच्या वतीने एक एप तयार करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सन 2002 आणि 2024 ची मतदार यादी आहे. यामुळे मतदारांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज हज हाऊस येथे राज्यातील पदाधिकारी व नगरसेवक यांची एकदिवसीय कार्यशाळा ओवेसींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी मार्गदर्शन केले.
What's Your Reaction?