अजमेर शरीफ उर्सनिमित्त जाण्याकरिता विशेष रेल्वे गाड्या

 0
अजमेर शरीफ उर्सनिमित्त जाण्याकरिता विशेष रेल्वे गाड्या

अजमेर येथील उर्सला जाण्याकरिता विशेष रेल्वे गाडी 

नांदेड,दि.23(डि-24 न्यूज) अजमेर येथील 813 व्या उरसास (ऊर्स) जाण्या करिता दक्षिण मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवीत आहे.

गाडी संख्या 07187 / 07188 नांदेड-अजमेर-नांदेड विशेष गाडी :

गाडी संख्या 07187 नांदेड ते अजमेर हि विशेष गाडी दिनांक 02 जानेवारी रोजी नांदेड येथून सकाळी 05.45 वाजता सुटेल आणि पूर्णा,परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, रोटेगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, भोपाळ, उज्जैन, रतलाम, चंदेरिया, भिलवडा मार्गे अजमेर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 15.15 वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी संख्या 07188 अजमेर ते नांदेड विशेष गाडी दिनांक 09 जानेवारी 2025 रोजी रात्री 23.20 वाजता अजमेर येथून सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 06.45 वाजता पोहोचेल.

या गाडीत एकून 24 डब्बे आहेत.

 

गाडी संख्या 07732 / 07733 काचीगुडा – अजमेर-काचीगुडा :

गाडी संख्या 07732 हि गाडी काचीगुडा येथून दिनांक 03 जानेवारी, 2025 रोजी रात्री 23.00 वाजता सुटेल आणि निजामाबाद, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, खंडवा, भोपाळ, उज्जैन, रतलाम, चितोरगढ मार्गे अजमेर येथे दिनांक 05 जानेवारी ला दुपारी 14.30 वाजता पोहोचेल. 

परतीच्या प्रवासात गाडी संख्या 07733 अजमेर येथून दिनांक 08 जानेवारी रोजी सायंकाळी 19.05 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच दिनांक 10 जानेवारी रोजी काचीगुडा येथे सकाळी 10 वाजता पोहोचेल.

या गाडीस 19 डब्बे असतील

 

 गाडी संख्या 07730/07731 हैदराबाद - अजमेर – हैदराबाद विशेष गाडी :

गाडी संख्या 07730 हैदराबाद ते अजमेर ही विशेष गाडी हैदराबाद येथून दिनांक 03 जानेवारी, 2025 रोजी दुपारी 16.00 वाजता सुटेल आणि सिकंदराबाद, निजामाबाद, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, खंडवा, भोपाळ, उज्जैन, रतलाम, चंदेरिया मार्गे अजमेर येथे दिनांक 05 जानेवारी ला सकाळी 06.15 वाजता पोहोचेल. 

परतीच्या प्रवासात गाडी संख्या 07731 अजमेर ते हैदराबाद हि विशेष गाडी अजमेर येथून 08 जानेवारी रोजी रात्री 20.00 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच हैदराबाद येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 07.45 वाजता पोहोचेल. 

 या गाडीस 19 डब्बे असतील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow