अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची थेट कर्ज योजना... इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची
थेट कर्ज योजना; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन
औरंगाबाद दि.14 (D24NEWS)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत मातंग समाजातील व्यक्तिंना लघु उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी थेट कर्ज योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षातकरीता जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
पात्रतेचे निकषः- अर्जदार हा मातंग समाजातील असावा. अर्जदाराचे वय 18 पूर्ण असावे व 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.3 लाखांपेक्षा जास्त नसावे. या पूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
योजनेत समाविष्ट लघु व्यवसायः-
मोबाईल सर्व्हिसींग, रिपेअरींग, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक वस्तु रिपेअरींग, फ्रिज, ए.सी. टि.व्ही. मायक्रोवेव्ह, लॅपटॉप, कॉम्प्युटर हार्डवेअर, ब्युटी पार्लर, ड्रेस डिझायनिंग, टेलरिंग, फुड प्रॉडक्टस, प्रोसेसींग, किराणा दुकान, जनरल, स्टेशनरी स्टोअर, मेडिकल स्टोअर, फॅब्रिकेशन, वेल्डींग, हार्डवेअर व सेनेटरी शॉप, प्रिंटीग, शिवणकला, झेरॉक्स लॅमिनेशन, हॉटेल, कॅटरींग सर्व्हिसेस, मंडप डेकोरेशन, क्रीडा साहित्य, स्पोर्ट शॉप, फास्ट फुड सेंटर, ज्युस सेंटर, क्लॉथ, रेडिमेड गारमेंट शॉप, मोटार मेकॅनिक, रिपेअर, शेतीशी निगडीत पुरक जोडव्यवसाय इ.
असा कराल अर्जः-
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्डची झेरॉक्स प्रत, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, दोन पासपोर्ट साईज फोटो, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन), व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुराव्यासोबत नमुना नं-अ, लाईट बिल व टॅक्स पावती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा शॉप ॲक्ट परवाना, व्यवसायाशी संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, शैक्षणिक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, अर्जदाराचे सिबिल क्रेडीट स्कोअर 500 असावा. प्रकरणासोबतची सर्व कागदपत्रे स्वत:च्या स्वाक्षरीने साक्षांकित करावीत.
महत्त्वाची सुचनाः-
कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रांसह उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ, मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत.
कर्ज योजनेचा प्रस्ताव दि.1 ते 29 सप्टेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, खोकडपुरा, शिवाजी हायस्कुलच्या बाजुला औरंगाबाद येथे सादर करावे
लाभार्थ्यांची निवड समिती मार्फतः-
थेट कर्ज योजने अंतर्गत कार्यालयाकडे यापूर्वी दाखल केलेले सर्व जुने कर्ज प्रस्ताव रद्द समजण्यात येणार आहेत. उद्दिष्टापेक्षा जास्तीचे प्रकरणे प्राप्त झाल्यास दि.14 मे 2012 च्या शासन निर्णयानुसार लॉटरी पद्धतीनुसार लाभार्थीची निवड केली जाईल. पात्र लाभार्थ्यांचे प्रकरण जिल्हा लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेने प्रादेशिक कार्यालयाकडे मंजुरीसाठी शिफारस करण्यात येईल,असे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
What's Your Reaction?