अन्नदान, रक्तदान करत उत्साहात ईद मिलादुन्नबी साजरी...

शहरात ईद मिलाद उत्साहात साजरी...
अन्नदान, रक्तदान करत शांततेत सण साजरा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) -
आज प्रेषित मोहंमद पैगंबर(स.अ.व.स.) यांच्या जन्मदिवस देशभर ईद मिलादुन्नबी म्हणून शांती व भाईचा-याचा संदेश देण्यासाठी मुस्लिम बांधव साजरा करतात. शहरात मागिल काही दिवसांपासून ऐतेहासिक गेटवर व धार्मिक स्थळांवर विद्युत रौशनाई करण्यात आली. आज सर्वत्र भोजनदान केले जाते. गरजुंना अन्नदान व विविध प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम घेत ईद मिलाद शांतता व सदभावनेने साजरी करण्यात आली. शहागंज व शहरातील विविध भागात अन्नदान करण्यात आले. खुलताबाद उर्स साठी लाखो भाविक तेथे जातात. प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या पैरण मुबारकचे(पोषाख) दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केली जाते. गणेशोत्सव सुरु असल्याने कमेटीने सर्व धर्म समभावाचा संदेश देत आज जुलुस-ए-मोहंमदी शहरात काढला नाही. हा जुलुस 8 सप्टेंबर रोजी सकाळी शहागंज हजरत निजामोद्दीन दर्गा येथून काढण्यात येणार आहे. या जुलुसमध्ये विशेष उपस्थिती पोलिस आयुक्त प्रविण पवार व सर्व जाती धर्मातील लोक उपस्थित राहुन जुलुसचे स्वागत करतात अशी माहिती जुलूस- ए-मोहंमदीचे अध्यक्ष डाॅ.शेख मुर्तुझा यांनी दिली आहे.
अन्नदान व रक्तदान शिबिर, विविध कार्यक्रमांद्वारे साजरी झाली ईद मिलादुन्नबी
मुलांमध्ये दिसला उत्साह, जुलूस-ए-मुहम्मदीची तयारी....
शुक्रवारी प्रेषित मोहंमद पैगंबर (स.अ.व.स.) यांच्या जन्मोत्सवानिमित्त 1500 वा जश्न-ए-ईद मिलादुन्नबी स.अ. शहरातील विविध परिसरांमध्ये अन्नदान, विविध कार्यक्रम व रक्तदान शिबिरांद्वारे साजरा करण्यात आला. त्यानंतर आता सोमवार, 8 सप्टेंबर रोजी जुलूस-ए-मुहम्मदीची 8 सप्टेंबर रोजी...
सकाळी 8 वाजल्यापासूनच शहाबाजार, चंपा चौक, रहमानिया कॉलनी, कैसर कॉलनी, दरगाह हजरत निजामुद्दीन रोड येथे अन्नदान कार्यक्रम सुरू झाला. यातून जाणाऱ्या प्रत्येकाला भोजन देण्यात आले. अनेक ठिकाणी आयोजकांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून ईद मिलादच्या निमित्ताने अन्नदान करण्याची परंपरा आहे. याशिवाय शहरातील विविध भागांत लहान मुले हातात हिरवे झेंडे घेऊन फिरताना दिसत होती. ईदचा उत्साह लहानग्यांमध्ये विशेष दिसून आला. सकाळपासूनच मुले रस्त्यावर उतरून झेंडे दाखवत लोकांना ईदची मुबारकबाद देताना आढळली.
गुरुवारी रात्रीपासूनच लोक भोजन तयार करण्यात गुंतलेले होते. त्यामुळे उशिरापर्यंत जुन्या शहरात गजबज दिसत होती. विद्युत रोषणाईने सजलेले शहर पाहण्यासाठी लोक मुलांना घेऊन फिरत होते.
कटकट गेट परिसरात ध्वजारोहण...
कटकट गेट परिसरातील जामियातुल ताजचे विद्यार्थी रॅली काढत कटकट गेट चौकात ध्वजारोहणासाठी पोहोचले. येथे अब्दुल रज्जाक जहिनी यांनी ध्वजारोहण केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक व मुले उपस्थित होती.
दरम्यान, जमाअत-ए-इस्लामी हिंदतर्फे महाराष्ट्र युथ मोव्हमेंटच्या वतीने शहरातील 8 केंद्रांवर सकाळी 9 वाजल्यापासून रात्रीपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या संख्येने युवकांसह महिलांनीही रक्तदान केले.
जुलूस-ए-मुहम्मदी 8 सप्टेंबर रोजी
सोमवार, 8 सप्टेंबर रोजी जुलूस-ए-मुहम्मदीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी अन्नदान व शरबत पाजण्याची व्यवस्था सोमवारीच केली जाणार आहे. निजामुद्दीन चौकातून सकाळी 8 वाजता जुलूस-ए-मुहम्मदी निघेल. त्याआधी पोलिस प्रशासनातर्फे जुलूस मुहम्मदी इंतजामिया कमिटीचे संयोजक डॉ. मुर्तुजा यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाईल आणि जुलूस रवाना होईल.
हा जुलूस शहागंज चमन, राजाबाजारातील गणपती मंदिराजवळून पुढे जात नवाबपुरा चौक, जिन्सी चौक, चंपा चौक, शहाबाजार, चेळीपुरा, मंजूरपुरा, मोमिनपुरा, लोटा कारंजा, कबाडीपुरा, बुड्ढी लेन, जुनाबाजार, सिटी चौक, सराफा, गांधी पुतळा मार्गे परत निजामुद्दीन चौक येथे संपन्न होईल. नागरिकांनी शांतता व सौहार्द राखून जुलूस-ए-मुहम्मदीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक डॉ. शेख मुर्तुजा यांनी केले आहे.
What's Your Reaction?






