अफसरखान यांनी दाखल केली वंचित व अपक्ष उमेदवारी, वंचितचे कार्यकर्ते बुचकळ्यात...!
 
                                अफसरखान यांनी दाखल केली वंचित व अपक्ष उमेदवारी, वंचितचे कार्यकर्ते बुचकळ्यात...
औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) शेवटच्या दिवशी अफसरखान यांनी वंचित बहुजन आघाडी व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली. अगोदर वंचितच्या वतीने अफसरखान यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यांनी प्रचारही सुरू केला होता प्रचार कार्यालय थाटले होते परंतु अचानक काल पत्रकार परिषद घेऊन आज अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहे मला वंचितचे एबी फाॅर्म मिळाले नाही असे सांगितले आणि आज वंचित व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केल्याने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते पुन्हा बुचकळ्यात पडले आहे. अफसरखान यांनी सांगितले होते की त्यांच्यासोबत काय राजकारण झाले ते मी 27 एप्रिल रोजी सांगणार आहे. परंतु आज दाखल केलेल्या शपथपत्रात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असल्याचे लिहिले आहे त्यांना एबी फाॅर्म मिळाले की नाही हे कळाले नाही. यामुळे वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. वंचितचे जिल्हाध्यक्ष योगेश बन यांना विचारले असता अफसरखान यांना एबी फाॅर्म दिलेले नाही. ते वंचितचे उमेदवार नाही असे ते म्हणाले. कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल. आज अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस होता वंचितने या मतदारसंघातून माघार घेतली का अशी अधिकृत घोषणा किंवा एखाद्या उमेदवाराला पाठिंबा आहे का असे पण जाहीर केले नाही म्हणून संभ्रमावस्था आहे. विशाल नांदरकर यांनीही आपल्या अर्जात वंचित बहुजन आघाडी लिहिले असल्याने आणखी संभ्रम वाढला आहे
 
 
 
.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            