अल्पसंख्याक आयुक्तालयाचे तात्पुरत्या स्वरूपात बुधवारी हज हाऊसमध्ये उद्घाटन करणार अब्दुल सत्तार
अल्पसंख्यांक आयुक्तालयाचे बुधवारी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन
-अल्पसंख्यांक समाजाला दाद मागण्याचा मार्ग मोकळा
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय पहिले आयुक्तालय
- अब्दुल सत्तार यांच्या कार्याची धमक अल्पसंख्यांक विभागात देखील कायम
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.24(डि-24 न्यूज) महाराष्ट्र शासनामार्फत अल्पसंख्यांक विभागाला स्वतंत्र आयुक्तालय मंजूर करण्यात आले असून दि.२६ जून रोजी सायं ४ वा हज हाऊस मधील हॉल मध्ये तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रम खा.संदीपान भुमरें यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. पहिले अल्पसंख्यांक आयुक्त होण्याचे मान श्री मो.बा.ताशीलदार यांना मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू होत असलेले आयुक्तालय हज हाऊस मधील प्रार्थना हॉल मध्ये होणार असल्याची अफवा पसरविण्यात आली असून सदर कार्यालय हज हाऊस मध्ये रिकामे असलेल्या हॉल मध्ये तात्पुरत्या स्वरूपात सुरू होणार असल्याचे स्पष्टीकरण अल्पसंख्यांक विभागामार्फत देण्यात आले आहे .
What's Your Reaction?