आज सायंकाळी आगळा वेगळा पुरस्कार वितरण, यायला विसरु नका, कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा...!

 0
आज सायंकाळी आगळा वेगळा पुरस्कार वितरण, यायला विसरु नका, कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा...!

आज सायंकाळी आगळा वेगळा पुरस्कार वितरण, यायला विसरु नका, कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा...!

औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) आज आपल्या शहरात आगळावेगळा पुरस्कार वितरण सोहळा सायंकाळी सात वाजता मौलाना आझाद रिसर्च सेंटर, मजनूहिल येथे होणार आहे या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मलीक अंबर जीवन गौरव पुरस्काराचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सुरक्षा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. शहरात टँकर गॅस गळतीची घटना घडली होती. महापालिकेचे व पोलीस दलातील जवानांनी जीवाची पर्वा न करता हि गळती रोखली म्हणून त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. शहरातील चार पोलिस ठाणे, अग्निशमन दल, दामिनी पथक यांना मलिक अंबर नागरी सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती डि-24 न्यूजला आयोजक जावेद पटेल, अल्ताफ पटेल यांनी दिली आहे. नागरीकांना त्यांनी आवाहन केले की जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow