उद्यापासून रोशनगेट ते कटकट गेट पर्यंत मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवणार
उद्यापासून रोशनगेट ते कटकट गेट पर्यंत मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवणार
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) शहरातील रस्त्यांवर होत असलेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उद्यापासून महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू होणार आहे. जुन्या शहरात जाण्यासाठी मुख्य 24 मीटरच्या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आल्याने रस्ते फक्त दहा ते बारा मीटर शिल्लक राहिल्याने रस्त्यावर ट्राफीक जाम होत आहे. यामुळे या रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी कार्यवाईचा बडगा उगारला आहे. उद्यापासून रोशनगेट ते कटकट गेट, कटकट गेट ते चंपाचौक, रोशनगेट ते जीन्सी पोलिस स्टेशन, जळगाव रस्त्यालगतचा सर्व्हिस रोड, एकता चौक ते भाजीवाली बाई पुतळा रोड या रस्त्यावर उद्या 3 ऑक्टोबर पासून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाणार आहे. विकास आराखड्यातील रस्ते व सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम मनपाने हाती घेतली आहे. अशी माहिती डि-24 न्यूजला मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली आहे.
What's Your Reaction?