काँग्रेस नेत्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, पोलिस आयुक्तांकडे तक्रार

 0
काँग्रेस नेत्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, पोलिस आयुक्तांकडे तक्रार

काँग्रेस नेत्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, पोलिस आयुक्तांकडे तक्रार...

माजी आमदाराच्या मुलाने दिली धमकी, धमकी देणारी व्यक्ती नामांकित घराण्याशी संबंधित 

औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) काँग्रेसचे नेते तथा माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांच्या मुलाला गुंडांनी जीवे मारायची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. इब्राहिम पटेल यांनी पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे. धमकी देणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे माझ्या मुलाने खरेदी घेतलेली शेतजमीन सर्वे नं.130 हर्सूल, औरंगाबाद क्षेत्रफळ 60 आर मध्ये सतत बेकायदेशीर अडथळा निर्माण करुन पैशाच्या जोरावर गुंड लोकांना हाताशी धरून माझा मुलगा शाकेर इब्राहिम पटेल याला जीवे मारायची धमकी देऊन माजी आमदाराचा मुलगा जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

शेख शाकेर पटेल याने अजय गुलाबराव पवार व इतर लोकांकडून मनपा हद्दीतील हर्सूल येथील सर्वे नं.130 मधील शेतजमीन ज्याचे क्षेत्रफळ 60 आर हि रितसर नोंदणीकृत खरेदीखताआधारे खरेदी केलेली असून त्यामध्ये वापरासाठी सिमेंट रोड तयार केला आहे. त्या शेजारी माजी आमदाराच्या मुलाने त्याच सर्वे नंबर मधील एक एकर जमीन खरेदी केली आहे. ती जमीन सहन होत नसल्याने त्या मिळकतीपैकी काही जमीन अत्यंत कमी भावात विक्री करण्याचा घाट घातला जात असून माझ्या मुलाने त्यास नकार दिला असता तो पैशाच्या आणि ताकदीच्या बळावर माझ्या मुलाने घेतलेल्या जमीनीत प्रत्यक्ष ताब्यात व वहीवाटीत बेकायदेशीर अडथळा निर्माण करत आहे. सतत धमक्या देत आहे. तुम्ही जमीन दिली नाही तर तुम्हाला देखील त्या जमीनीवर येऊ देणार नाही. माजी आमदाराच्या मुलाचे शहरातील नामांकित गुंड, बटन प्लेअर या लोकांशी संगनमत करून तो त्यांच्या मदतीने गोर गरीब लोकांना त्रास देऊन लोकांची मिळकती हडप करण्याचा काम करतो. वडील नामांकित राजकीय व्यक्ती व आमदार होते. हे गृहस्थ सुध्दा औरंगाबाद पूर्व मतदार संघातून एका पक्षाकडून निवडणूक लढवली होती. माजी आमदार यांच्या नावाचा वापर करुन कित्येक लोकांच्या मिळकती बेकायदेशीर हडप केलेल्या आहे. शासकीय मिळकतीवर , गावरान जमीनीवर, कब्रस्तानाची जमीनी, इनामी जमिनीचे खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून बळकावले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. माझ्या मुलीला धमकी देणारे भुमाफीया आहे. त्यांच्या विरोधात कोणी तक्रार द्यायला पुढे येत नाही. मागिल एक महिन्यापासून मुलाचे अपहरण करून जीवाचे बरेवाईट करण्याच्या धमक्या येत आहे. कुटुंबात यामुळे भितीचे वातावरण आहे. जीवन जगने अशक्य झाले आहे. तसेच त्यांच्या भितीमुळे माझा मुलगा आम्ही कोणीही खरेदी केलेल्या जमीनीवर जाण्यास मनात भिती निर्माण झालेली आहे. तो माजी आमदाराचा मुलगा म्हणत आहे त्याने कित्येक लोकांचे अपहरण करून त्यांचा थांगपत्ता लागू दिला नाही. इम्रान मेहंदी हा त्याचाच माणूस होता. त्यांच्या सांगण्यावरून त्याने कित्येक लोकांना ठिकाणी लावलेले आहेत. त्याने धार्मिक चेहरा वस्त्र धारण करून तो त्यांच्या आडून कित्येक लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले. लोकांची फसवणूक केली. 

26 ऑक्टोबर रोजी माजी आमदाराच्या मुलाने व त्यांचे सोबत अनोळखी चार पाच गुंड लोकांनी शेख शाकेर इब्राहिम पटेल हा हर्सूल येथील मिळकतीवर गेला असता त्यांनी रस्त्यावर अडविले व त्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पुन्हा येथे आला तर जिवंत मारुन या जमिनीतच दफन करुन टाकू अशी धमकी दिली. त्यांचे मंत्री लोकांशी संबंध आहे. त्यांचे कोणीही काहीही करू शकत नाही. कोठेही तक्रार केली तरीही माझे काही होणार नाही. अशी भीती मुलास दाखवली. म्हणून त्यांचे विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करुन सखोल चौकशी करून मला व माझ्या कुटुंबाला त्यांचे पासून स्वरक्षण द्यावे अशी लेखी तक्रार काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी पोलिस आयुक्त यांना दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow